गावसकरांनंतर आता जैस्वाल; मक्तेदारी फक्त मुंबईकरांचीच!

अनिरुद्ध संकपाळ

भारताकडून एका कसोटी मालिकेत 700 पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत मुंबईकर सुनिल गावसकर यांचे नाव अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 1971 वेस्ट इंडीज दौऱ्यावर 774 धावा केल्या होत्या.

दुसऱ्या स्थानावर देखील सुनिल गावसकरांचेच नाव असून त्यांनी 1978-79 ला विंडीज भारताच्या दौऱ्यावर आली होती त्यावेळी मालिकेत 732 धावा केल्या आहेत.

तिसऱ्या स्थानावर यशस्वी जैस्वालचे नाव असून त्याने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 712 धावा केल्या आहेत. त्याच्याकडे अजून एक डाव असून तो गावसकरांचे रेकॉर्ड देखील मोडू शकतो.

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहलीचे देखील नाव असून त्याने 2014-15 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 692 धावा केल्या होत्या.

याचबरोबर त्याने 2016 ला इंग्लंड भारताच्या दौऱ्यावर आली होती त्यावेळी कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या.

धरमशाला कसोटीपूर्वी टीम इंडियात काय घडतय?