Monika Shinde
मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु काहींसाठी ही कालावधी अत्यंत वेदनादायक ठरतो. विशेषतः पोटदुखी, पाठीचा ताण आणि थकवा येतो.
जर तुम्हाला औषधांशिवाय या त्रासांपासून आराम मिळवायचा असेल, तर योगासने एक प्रभावी आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतात.
हा श्वसनाभ्यास शरीरातल्या ऊर्जा प्रवाहाला संतुलित करतो. यामुळे मन शांत राहतं, आणि शरीराला उर्जा मिळते. पाळी दरम्यान मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी उपयुक्त.
हे विश्रांतीदायक आसन शरीरातील ताण कमी करतं. विशेषतः पाठीच्या खालच्या भागातील ताठरता, थकवा आणि पोटदुखी कमी करण्यासाठी बालासन खूप प्रभावी ठरतं.
या आसनामुळे पेल्विक भागात रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या गाठी, ताठरता आणि दुखण्यात आराम मिळतो.
पाठदुखी आणि तणाव दूर करणारे हे आसन पोट, पाठ आणि पायांवर एकसंध काम करतं. गर्भाशयाच्या आजूबाजूचा ताण कमी होतो आणि मन अधिक स्थिर राहतं.
पचनक्रिया सुधारण्यासोबतच, हे आसन मनाला शांतता देतं. मासिक पाळीच्या वेळी होणारी अपचन, जडपणा आणि थकवा कमी होतो.
मासिक पाळी दरम्यान आराम मिळवता येतो.आणि शरीरातील ताण कमी होतो. आणि मानसिक शांती मिळवते.