Pranali Kodre
क्रिकेटमध्ये शतक ठोकणे ही कोणत्याही खेळाडूसाठी मोठा पल्ला असतो. त्यातही जर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही प्रकारात शतक ठोकणे म्हणजे सोन्याहून पिवळे.
Brian Bennett
Sakal
आत्तापर्यंत असा कारनामा काही मोजक्या खेळाडूंनाच करता आला आहे. आता यात झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटचाही समावेश झाला आहे.
Brian Bennett
Sakal
ब्रायनने नुकतेच आयसीसी टी२० वर्ल्ड कप आफ्रिका विभाग क्वालिफायर स्पर्धेत ३० सप्टेंबर रोजी तान्झानियाविरुद्ध ६० चेंडूत १११ धावांची खेळी केली.
Brian Bennett
Sakal
त्यामुळे ब्रायन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. त्याचे वय ३० सप्टेंबर रोजी २१ वर्षे ३२४ दिवस होते.
Brian Bennett
Sakal
ब्रायनने यापूर्वी कसोटीत २ शतके आणि वनडेत १ शतक केले आहे. त्याने हा विक्रम करताना अहमद शहजाद आणि शुभमन गिललाही मागे टाकले आहे.
Brian Bennett
Sakal
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात सर्वात कमी वयात शतक करणाऱ्यामध्ये ब्रायनपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आता अहमद शहजाद असून त्याने २२ वर्षे १२७ दिवस वय असताना असा कारनामा केला होता.
Ahmed Shahzad
Sakal
शुभमन गिलने २३ वर्षे २४१ दिवस वय असताना असा कारनामा केला होता. तो या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Shubman Gill
Sakal
सुरेश रैना या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याने २३ वर्षे २४१ दिवस वय असताना तिन्ही प्रकारात शतक करण्याचा कारनामा केला होता.
Suresh Raina
Sakal
केएल राहुल पाचव्या क्रमांकावर असून त्याने २४ वर्षे १३१ दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करण्याचा पराक्रम केला होता.
KL Rahul
Sakal
Tilak Varma
Sakal