सर्वात कमी वयात 100 T20 सामने खेळणारे क्रिकेटर

प्रणाली कोद्रे

आयपीएल 2024

आयपीएल 2024 स्पर्धेत 28 मार्च 2024 रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला.

Riyan Parag | Sakal

100 टी20 सामने

हा सामना राजस्थानचा अष्टपैलू रियान परागचा कारकिर्दीतील 100 वा टी20 सामना होता.

Riyan Parag | Sakal

रियान पराग

त्यामुळे रियान पराग सर्वात कमी वयात 100 टी20 सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. 28 मार्च रोजी 100वा टी20 सामना खेळताना त्याचे वय 22 वर्षे 139 दिवस इतके वय होते.

Riyan Parag | Sakal

संजू सॅमसन

रियान परागने संजू सॅमसनचा विक्रम मागे टाकला आहे. सॅमसनने 22 वर्षे 157 दिवस वय असताना 100 वा टी20 सामना खेळला होता.

Riyan Parag | X/IPL

वॉशिंग्टन सुंदर

सर्वात कमी वयात 100 टी20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर आहे. त्याने 22 वर्षे 181 दिवस वय असताना 100 वा टी20 सामना खेळला होता.

Washington Sundar | X/IPL

ईशान किशन

चौथ्या क्रमांकावर ईशान किशन असून त्याने 22 वर्षे 273 दिवस वय असताना 100 वा टी20 सामना खेळला होता.

Ishan Kishan | X/IPL

ऋषभ पंत

पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत असून त्याने 22 वर्षे 361 दिवस इतके वय असताना 100 टी20 सामना खेळला होता.

Rishabh Pant | X/IPL

Hardik Pandya: इकडं मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना घोर, तिकडं भाऊचं फोटो शूट

Hardik Pandya Photoshoot | Instagram