शरीर देत आहे रक्ताभिसरण बिघडल्याचे 6 धोकादायक संकेत!

Aarti Badade

शरीरातील रक्ताभिसरण

रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होत नसेल, तर त्याचे गंभीर परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतात आणि आरोग्याच्या समस्या वाढतात.

Poor blood circulation symptoms

|

Sakal

दिवसभर थकवा जाणवणे

शरीरातील अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नसेल, तर अगदी कमी काम केल्यानंतरही शरीराला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो.

Poor blood circulation symptoms

|

Sakal

हात-पाय सुन्न पडणे

रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे हात किंवा पायांना वारंवार झिणझिण्या येतात किंवा ते भाग सुन्न पडल्यासारखे वाटू शकतात.

Poor blood circulation symptoms

|

Sakal

पाय आणि घोट्यांना सूज येणे

हृदय रक्ताचा उपसा वेगाने करू शकत नसल्यास जास्त वेळ बसल्यावर किंवा उभं राहिल्यावर पाय आणि घोट्यांना सूज येऊ शकते.

Poor blood circulation symptoms

|

Sakal

शरीरावरील जखमा

कमी रक्तप्रवाहामुळे जखमांना आवश्यक पोषण मिळत नाही, परिणामी संसर्ग किंवा जखम लवकर बरी न होता खूप वेळ लागतो.

Poor blood circulation symptoms

|

sakal

पायांवर निळसर फुगलेल्या शिरा

शिरांमध्ये रक्त साचल्यामुळे त्वचेवर वाकड्या-तिकड्या जांभळ्या रंगाच्या शिरा दिसू लागतात, ज्यामुळे पायात वेदना आणि जडपणा जाणवतो.

Poor blood circulation symptoms

|

Sakal

स्मरणशक्ती कमी होणे

मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नसेल, तर गोष्टी वारंवार विसरणे किंवा कामात गोंधळल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.

Poor blood circulation symptoms

|

Sakal

लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या

थकवा, सूज किंवा हात-पाय गार पडणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आरोग्यासाठी उत्तम असते.

Poor blood circulation symptoms

|

Sakal

कोलेस्ट्रॉल अन् हृदयविकाराच्या रुग्णांनी अंडी कशी खावीत? तज्ज्ञांचं सत्य आलं समोर

Egg Yolk Benefits and Calories Balance

|

Sakal

येथे क्लिक करा