शरीर सांगतंय पाणी कमी पिताय! ‘हे’ संकेत ओळखा अन् सावध व्हा

Aarti Badade

उन्हाळा आणि डिहायड्रेशन

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे 'डिहायड्रेशन'चा धोका वाढतो, त्यामुळे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.

Signs of dehydration in summer

|

Sakal

सततची डोकेदुखी हे आहे संकेत

जर तुम्ही कमी पाणी पित असाल, तर मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.

Signs of dehydration in summer

|

Sakal

तोंड आणि ओठ कोरडे पडणे

तोंड नेहमीपेक्षा जास्त कोरडे होणे किंवा ओठ सुकणे हे शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे पहिले महत्त्वाचे लक्षण आहे.

Signs of dehydration in summer

|

Sakal

लघवीचा बदलता रंग आणि प्रमाण

दिवसातून कमी वेळा लघवीला होणे किंवा लघवीचा रंग गडद (Dark) होणे हे तुम्ही पुरेसे पाणी पीत नसल्याचे स्पष्ट लक्षण आहे.

Signs of dehydration in summer

|

Sakal

त्वचेचा कोरडेपणा आणि कमी होणारा ग्लो

जेव्हा त्वचा कोरडी पडते आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक (Glow) कमी होते, तेव्हा समजून जा की तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे.

Signs of dehydration in summer

|

Sakal

तहान न लागल्यामुळे होणारे दुर्लक्ष

अनेकांना तहान लागत नाही म्हणून ते पाणी पिणे टाळतात, पण तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी पिणे आरोग्यासाठी हिताचे आहे.

Signs of dehydration in summer

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला आणि सावधगिरी

वरील लक्षणे दिसल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे, मात्र कोणतेही गंभीर उपचार किंवा डाएट करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

Signs of dehydration in summer

|

Sakal

किडनी स्टोनची वेदना टाळायची असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा!

Kidney stone causes and diet

|

Sakal

येथे क्लिक करा