मेंदू होईल कॉम्प्युटरपेक्षा फास्ट, रोज न चुकता करा 'ही' सोपी योगासने

Yashwant Kshirsagar

योग

आपल्या मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी योगासन करणे ही एक चांगली पद्धत आहे. योग केल्याने केवळ आपले शरीर तंदुरुस्त होतेच, शिवाय मानसिक शांती, एकाग्रता आणि मेंदूची ताकद देखील वाढते.

Brain Booster yoga | esakal

मेंदूची क्षमता

जर तुम्ही मेंदू सुपर कॉम्प्युटरसारखा बनवायचा असेल तर दररोज न चुकता योगासने केली पाहिजेत. या आसनांमुळे तुमच्या मेंदूची क्षमता वाढेल आणि मानसिक ताण देखील दूर होईल.

Brain Booster yoga | esakal

भ्रामरी प्राणायम

हे आसन करण्यासाठी आरामात बसा आणि आपले डोळे बंद करा. आता खोल श्वास घ्या आणि तोंडातून हं आवाज करत श्वास नाकावाटेच बाहेर सोडा. ही क्रिया 5-10 वेळा करा.

Brain Booster yoga | esakal

वृक्षासन

हे आसन करण्यासाठी आधी तुम्ही सरळ उभे राहा. नंतर एक पाय गुडघ्यातून मुडपून दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. यानंतर दोन्ही हात जोडून डोक्याच्या पर ठेवा. 30 सेंकद ते 1 मिनटापर्यंत याच स्थितीत उभे राहा.

Brain Booster yoga | esakal

सर्वांगासन

हे आसन करण्यासाठी आधी पाठीवर सरळ झोपा. नंतर पाय वरची उचला खांद्याच्या बलावर शरीराला संतुलित करा. दोन्ही हातांनी पाठीला आधार द्या, आणि 30 सेकंदापर्यंत याच पोजिशनमध्ये राहा.

Brain Booster yoga | esakal

सिद्धासन

हे योगासन करण्यासाठी जमिनीवर बसा, दोन्ही पाय दुमडून एक पाय दुसऱ्या पायावर ठेवा, मग दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे बंद करुन खोल श्वास घ्या. 5 ते दहा मिनिटे लक्ष केंद्रित करा.

Brain Booster yoga | esakal

उष्ट्रासन

हे आसन करण्यासाठी गुडघ्यांवर बसा दोन्ही हात कमेरवर ठेवा. मग हळू-हळू पाठ मागच्या बाजुला झुकवा. दोन्ही हातांनी टाचा पकडा काही सेंकद याच स्थितीत राहा. आणि सामान्य स्थितीत परता.

Brain Booster yoga | esakal

ध्यान

ध्यान हे योगाचे महत्वाचा भाग मानले जाते. ध्यानामुळे मेंदू शांत होतो. तणाव कमी होतो आणि मानसिक स्थिती मजबूत होते. मेंदूची ताकद वाढविण्याचा ही सगळ्यात प्रभावी पद्धत आहे.

Brain Booster yoga | esakal

दररोज एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून खाल्ले तर काय होईल?

Methi Seeds Health Benefits | esakal
येथे क्लिक करा