Monika Shinde
YouTube ने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की १५ जुलैपासून त्याच्या धोरणांमध्ये (पॉलिसी) बदल करण्यात आला आहे.
या नव्या बदलामुळे अनेक यूट्यूब चॅनेल्सच्या कमाईवर थेट परिणाम होणार आहे. चला या नव्या धोरणांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आजकाल अनेक क्रिएटर्स एकाच प्रकारचा, सारखा किंवा रिपीट होणारा कंटेंट टाकत आहेत. YouTube ने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि अशा कंटेंटवर मर्यादा आणण्यासाठी धोरणात बदल केला आहे.
१५ जुलैपासून YouTube आपल्या पार्टनर प्रोग्रामचे नियम अधिक कडक करत आहे. पुढील काळात या नियमांचा प्रभाव संपूर्ण प्लॅटफॉर्मवर दिसून येणार आहे.
नवीन धोरणानुसार, मास प्रोड्यूस्ड (मोठ्या प्रमाणावर तयार केलेला), रिपीट होणारा आणि ओरिजिनल नसलेला कंटेंट असलेल्या चॅनेल्सच्या जाहिरात उत्पन्नात कपात केली जाईल.
YouTube च्या या नवीन बदलांमध्ये मोनेटायझेशनसाठीची मूळ अटी बदललेल्या नाहीत. म्हणजेच, चॅनेल मोनेटायझेशनसाठी लागणाऱ्या अटी पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.
AI च्या मदतीने तयार होणाऱ्या व्हिडीओजची संख्या झपाट्याने वाढत आहे. YouTube च्या नवीन धोरणात, AI जनरेटेड कंटेंट कमी करून, मूळ (Original) कंटेंटला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे.
AI आणि Deepfake तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक जण बनावट माहिती किंवा फसवणूक करणारा कंटेंट तयार करत आहेत. उदा. एखाद्याचा फोटो वापरून त्यावर बनावट आवाज टाकणे. YouTube हे थांबवण्यासाठी कारवाई करणार आहे.
हे 6 भारतीय खाद्यपदार्थ परदेशात 'बॅन' आहेत! कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!