Anuradha Vipat
युट्यूबर अरमान मलिकने एका मुलाखतीत त्याच्या संपत्तीच्या आकड्याचा खुलासा केला होता.
त्यानंतर त्याला अंडरवर्ल्ड आणि गँगस्टरकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो.
अरमानने पायल आणि कृतिका या दोघींशी लग्न केलं असून त्यांना चार मुलं आहेत.
एका मुलाखतीत अरमानने सांगितलं होतं की,त्याची संपत्ती 100-200 कोटींच्या घरात आहे.
पुढे अरमानने सांगितलं होतं की, आता वेगवेगळे गँगस्टर त्याला फोन करून धमक्या देत आहेत.
युट्यूबर म्हणून नाव कमावण्याआधी अरमानने अनेक छोटी-मोठी कामं केली आहेत.