Pranali Kodre
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेतला आहे.
यादरम्यान चहल आरजे महावशला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी चहल आणि महावश एकत्र दिसल्याने या चर्चांना सुरुवात झाली होती.
पण महावशने ते फक्त चांगले मित्र असल्याचे सांगत या चर्चा फेटाळल्या होत्या.
दरम्यान, महावशने २ एप्रिलला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये ती तिचा आदर्श पार्टनर कसा असेल, हे सांगत आहे. या व्हिडिओला तिने 'बस एक ही होगा.'
या व्हिडिओला युझवेंद्र चहलनेही लाईक दिलं आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्यातील रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले आहे.