Pranali Kodre
१६ वर्षांचा विश्वासाचा प्रवास, ५ आयपीएल ट्रॉफी अन् पिवळ्या जर्सीसाठी एक सुवर्णकाळ रचणाऱ्या स्टीफन फ्लेमिंग यांच्या निरोपानंतर चेन्नई सुपर किंग्स आज एका नव्या वळणावर उभी आहे.
Stephen Fleming
Sakal
फ्लेमिंग गेल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी अनेक नावं समोर आली. पण अखेर कॅप्टन कूल एमएस धोनीने आपला जुना आणि विश्वासू शिलेदार निवडलाय, तो म्हणजे २०११ च्या विश्वचषकाचा नायक झहीर खान.
Zaheer Khan
Sakal
झहीर खान याला चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
Zaheer Khan
Sakal
आयपीएलच्या इतिहासात झहीर चेन्नई सुपर किंग्सचा फक्त तिसराच मुख्य प्रशिक्षक ठरला आहे, तसेच पहिला भारतीय मुख्य प्रशिक्षक ठरला आहे.
Zaheer Khan
Sakal
यापूर्वी २००८ ते २०२६ पर्यंत चेन्नईने दोनदाच मुख्य प्रशिक्षक नेमले, हे दोन्ही परदेशी होते.
Stephen Fleming
Sakal
फ्लेमिंग यांनी २००९ ते २०१५ आणि २०१८ ते २०२६ अशा कार्यकाळात चेन्नईचे प्रशिक्षकपद सांभाळले. (२०१६ -२०१७ चेन्नईवर बंदी होती.)
Stephen Fleming
Sakal
फ्लेमिंग याचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ या पाच वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकले.
Stephen Fleming
Sakal
मात्र, फ्लेमिंगच्याही आधी २००८ मध्ये सर्वात पहिल्या आयपीएल हंगामात चेन्नईचे मुख्य प्रशिक्षकपद माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू केपलर वेसेल्स यांनी सांभाळले होते.
Kepler Wessels
Sakal
केपलर वेसेल्स यांच्या मार्गदर्शनातही चेन्नईने २००८ च्या आयपीएलमध्ये अंतिम सामना गाठला होता, पण राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
Kepler Wessels
Sakal
Cricketers With the Longest Names
Sakal