ना लाईट बिल, ना गॅसचा खर्च! पुण्याजवळील ‘या’ गावाची भन्नाट गोष्ट!

Aarti Badade

महात्मा गांधींचे स्वप्न झाले साकार!

'स्वयंपूर्ण खेडं' हे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते. पुण्यातील टिकेकरवाडी गावाने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून देशासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

Tikekarwadi

|

Sakal

सौरऊर्जेचा यशस्वी वापर

पुण्यापासून १२० किमी अंतरावर असलेल्या या गावाने वीज बचतीचे मोठे धोरण राबवले असून, सार्वजनिक इमारतींवर सौर पॅनेल बसवले आहेत.

Tikekarwadi

|

Sakal

शाळेलाही येत नाही वीज बिल!

गावातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आणि पथदिव्यांसाठी लागणारी सर्व वीज सौरऊर्जेतून तयार केली जाते, ज्यामुळे वीज बिल आता 'शून्य' येते.

Tikekarwadi

|

Sakal

घरोघरी गोबर गॅसची सुविधा

ग्रामपंचायतीने गावातच गोबर गॅस निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे गावातील सर्व कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध झाला आहे.

Tikekarwadi

|

Sakal

ओला कचरा मुक्त गाव

गावाने 'ओला कचरा मुक्त गाव' हे ध्येय समोर ठेवून काम केले. या कचऱ्याचा वापर करून गॅस आणि नैसर्गिक खताची निर्मिती केली जाते.

Tikekarwadi

|

Sakal

रासायनिक खतांना फाटा

गोबर गॅस प्रकल्पातून मिळणाऱ्या स्लरीचा वापर शेतीसाठी खत म्हणून केला जातो. यामुळे शेती आता रासायनिक खतांशिवाय बहरली असून उत्पादनातही वाढ झाली आहे.

Tikekarwadi

|

Sakal

राष्ट्रपतींकडूनही झाले कौतुक

टिकेकरवाडीच्या या आत्मनिर्भरतेचे आणि स्वच्छतेचे कौतुक थेट राष्ट्रपतींनीही केले आहे. अवघ्या ११०० लोकसंख्येच्या या गावाने मोठे बदल घडवले आहेत.

Tikekarwadi

|

Sakal

आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण

गावाचा कारभार विनाखर्च व्हावा आणि गाव स्वयंपूर्ण व्हावे हा ग्रामस्थांचा निर्धार आज यशस्वी झाला आहे.

Tikekarwadi

|

Sakal

छत्रपती संभाजीनगर मधील या गावात लग्न कोणत्याही दिवशी असो, हळद मात्र रविवारीच लागते!

Sunday Haldi tradition of Pal Village

|

Sakal

येथे क्लिक करा