Shubham Banubakode
वर्षांतील दोन दिवस असे असतात, ज्यावेळी सावली आपली साथ सोडले. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.
या दिवशी सूर्य डोक्यावर आल्यावर सावली दिसेनाशी होते. या दिवसांना ‘झीरो शॅडो दिवस' असं म्हटलं जातं.
विशेष म्हणजे ही खगोलीय घटना आता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्रात १५ मे आणि २७ जून रोजी मुंबई, अमरावतीसह काही भागात सावली काही मिनिटांसाठी आपली साथ सोडणार आहे.
१५ मे रोजी १२.३४ मिनिटांनी, तर २७ जूर रोजी १२.४५ मिनिटांनी हा अनुभव घेता येणार आहे.
यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
दोन्ही दिवशी दुपारी ५२ सेकंदांसाठी हा अनुभव घेता येणार आहे.
कर्कवृत्त आणि मकरवृत्तादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येते.
अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो.