नाशिकमधल्या गावचे दोनजण चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान बनलेत

सकाळ वृत्तसेवा

‘इंदोरे’ – एक साधं पण खास गाव

नाशिकपासून अवघ्या २० किमीवर असलेलं ‘इंदोरे’ गाव. टुमदार घरे, छोटी मंदिरे, हिरवीगार शेती, आणि एक ऐतिहासिक दर्गा असलेलं साधं गाव.

Prime Ministers of Pakistan | Sakal

दोन पंतप्रधान दिलेले गाव

या गावाने पाकिस्तानला दोन पंतप्रधान दिले आहेत – झुल्फिकार अली भुत्तो आणि बेनझीर भुत्तो.

Prime Ministers of Pakistan | Sakal

भुत्तो कुटुंबाची मूळ कथा

भुत्तो मूळचे राजस्थानचे राजपूत. औरंगजेबाच्या काळात धर्मांतर होऊन सिंधमध्ये स्थायिक झाले. इंग्रज काळातही त्यांचा दबदबा कायम होता.

Prime Ministers of Pakistan | Sakal

इंदोरे गावातील भुत्तोंचा वारसा

भुत्तोंना नाशिक परिसरात जहागिरी मिळाल्या. इंदोरे गावात मोठा बंगला, बारव आणि शेती होती. आजही त्यांच्या दफनभूमीचे अवशेष आहेत.

Prime Ministers of Pakistan | Sakal

शाहनवाज भुत्तोंचा प्रभाव

झुल्फिकार अली यांचे वडील शाहनवाज भुत्तो जुनागढचे दिवाण होते. नाशिक नगरपालिका स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

Prime Ministers of Pakistan | Sakal

झुल्फिकार अली भुत्तोचं बालपण

मुख्यतः मुंबईत वाढले. ऑक्सफर्ड आणि अमेरिकेतील शिक्षण. मधुबालावर प्रेम आणि फिल्म इंडस्ट्रीतही रस होता.

Prime Ministers of Pakistan | Sakal

इंदोरे गावातील आठवणी

गर्भवती पत्नी नुसरतसह इंदोरेत काही काळ वास्तव्य. मोठ्या भावाच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब पाकिस्तानला स्थलांतरित.

Prime Ministers of Pakistan | Sakal

बेनझीरचा जन्म आणि बारव दान

पाकिस्तानात पोहोचताच कन्यारत्न – बेनझीर. भारतात येताना इंदोरे गावातील मोठी बारव गावकऱ्यांना भेट दिली.

Prime Ministers of Pakistan | Sakal

भुत्तोंचा राजकीय प्रवास

झुल्फिकार अली भुत्तो – पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान बनले. बेनझीर दोनदा पंतप्रधान झाल्या.

Prime Ministers of Pakistan | Sakal

आजचा इंदोरे – अभिमानाचं गाव

आजही इंदोरे गावात भुत्तोंच्या आठवणी जिवंत. गावकरी अभिमानाने सांगतात – “बेनझीर आमच्या गावचीच होती!”

Prime Ministers of Pakistan | Sakal

आग्र्याहून सुटकेनंतर शंभुराजे अनेक महीने 'या' हवेलीत गुप्तपणे राहिले होते

sambhaji maharaj | Sakal
येथे क्लिक करा