Redmi TV Biggest Offer : रेडमीचा 32 इंची F सीरीज HD रेडी स्मार्ट LED फायर TV लाँच

Redmi 32 inches Smart LED TV - रेडमीने आपला नवीन 32 इंची F सीरीज HD रेडी स्मार्ट LED फायर TV L32MA-FVIN भारतीय बाजारात लाँच केला आहे
Redmi 32-inch HD Ready Smart TV
Redmi 32-inch HD Ready Smart TVSakal Prime Deals
Published on

Top 32-inch TVs under budget: रेडमीने आपला नवीन 32 इंची F सीरीज HD रेडी स्मार्ट LED फायर TV L32MA-FVIN भारतीय बाजारात लाँच केला आहे. या नवीन टीव्हीसाठी विशेष ऑफर्स आणि आकर्षक फीचर्स उपलब्ध आहेत.

याची मुख्य वैशिष्ट्य बघायला गेलं तर याची स्क्रीन साइज 32 इंची असून LED डिस्प्ले आहे. याचं रेझोल्यूशन 720p HD रेडी एवढं असून (1366x768) रिफ्रेश रेट 60 हर्ट्झ इतका आहे.

फायर OS 7 सह मिळणाऱ्या या टीव्ही मध्ये अलेक्सा व्हॉईस रिमोट फीचर आहे.

शिवाय अॅप्स सपोर्ट मध्ये प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि 12,000+ अॅप्स आहेत. साउंड आउटपुट बघायला गेलं तर 20 वॅट्स डॉल्बी ऑडिओसह हा टिव्ही येतो.

Redmi 80 cm (32 inches) F Series HD Ready Smart LED Fire TV

कनेक्टिव्हिटीचं बोलाल तर ड्युअल बँड वाय-फाय (2.4GHz/5GHz),  2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट, ARC, ब्लूटूथ 5.0, ईथरनेट आणि 3.5mm इअरफोन जॅक आहे.

रेडमीच्या या टीव्हीमध्ये मेटल बेजेल-लेस स्क्रीन, HDR10 तंत्रज्ञान आणि Vivid Picture Engine आहे. यासोबतच DTH सेट-टॉप बॉक्स इंटिग्रेशन आहे, ज्यामुळे DTH टीव्ही चॅनेल्स आणि OTT अॅप्स सहजपणे स्विच केले जाऊ शकतात.

ऑडिओ आणि व्हिडिओसाठी 20 वॅट्स साउंड आउटपुटसह Dolby Audio, DTS Virtual: X आणि DTS-HD सपोर्टेड आहे, ज्यामुळे उत्तम साउंड क्वालिटी मिळते.

स्मार्ट फीचर्स

फायर TV बिल्ट-इन असून यात प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, यूट्यूब आणि अन्य 12,000+ अॅप्ससाठी सपोर्ट आहे.

याशिवाय Airplay आणि Miracast सारख्या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील कंटेंट स्क्रीनवर बघू शकता.

किंमत आणि ऑफर्स  

या टीव्हीची किंमत ऑफर मध्ये 10,499 असून HDFC बँक क्रेडिट कार्डवर जर EMI करत असाल तर 514 रुपये प्रति महिना (24 महिन्यांसाठी) वर हा टिव्ही उपलब्ध आहे.

याशिवाय जुने प्रोडक्ट एक्सचेंज करून तुम्ही 2,750 पर्यंतची बचत करू शकता. SBI क्रेडिट कार्ड धारकांसाठी 10% सूटची खास ऑफर देखील आहे.

वॉरंटी

1 वर्षांची वॉरंटी आणि पॅनलसाठी 1 वर्षाची अतिरिक्त वॉरंटी उपलब्ध आहे.

रेडमीचा हा नवीन टीव्ही कमी किमतीत उत्तम फिचर्स देणारा असून सामान्य ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com