

Popular phones under 15000: ₹15,000 बजेट मध्ये अनेक स्मार्टफोनचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे फोन निवडणे थोडे कठीण होऊ शकते. हा प्रश्न सोडवण्यासाठी, आम्ही ₹15,000 च्या बजेटमध्ये खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम फोनची यादी तयार केली आहे. यात Samsung आणि Vivo सारख्या ब्रँड्ससोबत CMF आणि Poco सारख्या नवीन ब्रँड्सचाही समावेश केलाय. हे सर्व स्मार्टफोन 5G, हाय रिफ्रेश रेट सारख्या वैशिष्ट्यांसह येतात.
CMF Phone 1 ची किंमत ₹15,999 पासून सुरू होते, ज्यामध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेजचा पर्याय आहे. मात्र, बँक ऑफर्समुळे हा फोन Flipkart वर ₹15,000 च्या आत सहज उपलब्ध होतो.
यात 6.5-इंचाचा Full HD+ IPC LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 560 निट्स पीक ब्राइटनेस आहे. यामध्ये MediaTek Dimensity 7025 प्रोसेसर आहे आणि हा Android 14 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 6,000 mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जर बॉक्समध्ये मिळतो.
यात 6.72-इंचाचा फ्लॅट Full HD+ LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट आहे 120Hz ज्यामुळे स्क्रीन एकदम झकास दिसते. शिवाय 1,000 निट्स पीक ब्राइटनेससह, T3x Snapdragon 6 Gen 1 SoC वर हा फोन चालतो. या स्मार्टफोनमध्ये 128GB अंतर्गत स्टोरेज असून, micro SD कार्डद्वारे 1TB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेज उपलब्ध आहे. 6000mAh बॅटरीसह 44W फास्ट चार्जिंग असलेला स्मार्टफोन Android 14 आधारित FuntouchOS 14 वर काम करतो.
यात 6.79-इंचाची LCD स्क्रीन आहे, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि समोर Corning Gorilla Glass 3 आहे. डिस्प्लेचा रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल्स आहे आणि उच्च ब्राइटनेस मोडमध्ये पीक ब्राइटनेस 550 निट्स आहे (सामान्य ब्राइटनेस 450 निट्स).
₹12,999 पासून सुरू होणाऱ्या Galaxy F15 5G मध्ये 6.5-इंचाचा Full HD+ sAMOLED डिस्प्ले आहे, ज्यात 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे आणि 6GB RAM आणि 128GB स्टोरेजपर्यंत सपोर्ट आहे. Galaxy F15 5G मध्ये microSD कार्डद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज देखील करता येऊ शकते.