बॉलिवूडमधील नव्वदच दशक गाजवणारा एक अभिनेता म्हणजे गोविंदा. नव्वदच्या दशकातील सुपरस्टार म्हणून त्याची ओळख होती.
गोविंदाने सुनीताशी गुपचूप लग्न केलं. जवळपास दोन ते तीन वर्षं त्याने त्यांचं लग्न लपवलं होतं. पण त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीमध्ये अनेक अभिनेत्रींशी त्याची नावं जोडली गेली.
बॉलिवूडमधील एक सुंदर अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. कमी वयात भरपूर यश मिळवणाऱ्या अभिनेत्रीची गोविंदाबरोबर जोडी खूप गाजली.
अल्पायुषी ठरलेली ही अभिनेत्री अतिशय प्रसिद्ध होती. कमी काळात खूप पैसे कमावणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं.
गोविंदांबरोबर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्या काळी ऑनस्क्रीन आवडलेल्या जोड्यांमध्ये दिव्या आणि गोविंदाची जोडी आघाडीवर होती. गोविंदाने तर उघडपणे प्रेमाची कबुलीही दिलेली.
स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने सांगितलं की त्याला दिव्या आवडते पण सुनीताशी त्याच लग्न झालं असल्यामुळे दिव्यापासून तो दूर राहतोय. भविष्यात तो दुसऱ्या कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये येऊ शकतो. कदाचित तो तिच्याशी लग्नही करू शकतो असंही त्याने सुनीताला सांगितलं.