सकाळ वृत्तसेवा
कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीर व मन दोन्ही ताजेतवाने होतात. अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्मांमुळे अनेक त्वचासंबंधी त्रास दूर होतात.
कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास मुरुम कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. डाग आणि डार्क स्पॉट्ससाठी ते उपयोगी आहे.
कोंड्याने त्रस्त आहात? कडुलिंबाचे पाणी केसांवर वापरल्यास कोंडा कमी होतो आणि निर्जीव केसांमध्ये नैसर्गिक चमक येते.
कडुलिंबाच्या पाण्याने डोळे धुतल्यास लालसरपणा, जळजळ आणि सूज यावर आराम मिळतो.
उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या पुरळ, घामोळ्यांवर कडुलिंबाचे पाणी प्रभावी आहे. अँटीबॅक्टेरियल घटक त्वचेला आराम देतात.
कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास घामाची दुर्गंधी दूर होते. शरीरातील बॅक्टेरियांची वाढ थांबते.
उवांची समस्या असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने केस धुवावेत. हे पाणी उवांच्या अंडी व पोळ्या नष्ट करण्यास मदत करते.
कडुलिंबाच्या पाण्यामुळे हिरड्या मजबूत राहतात. अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया कमी करतात.
आठवड्यातून २-३ वेळा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा, केस, डोळे, तोंड – सर्वांनाच मिळते नैसर्गिक संरक्षण!