Anushka Tapshalkar
तुळस ही आयुर्वेदातील उपयुक्त औषधी वनस्पती आहे. रिकाम्या पोटी तिचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीर शुद्ध होते आणि आरोग्य सुधारते.
तुळशीतील अँटिऑक्सिडंट्स आणि ऑईल्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. रोज सकाळी तिचे सेवन केल्याने बॅक्टेरिया व व्हायरसशी लढण्याची ताकद मिळते.
तुळशीचे डिटॉक्स गुणधर्म यकृत स्वच्छ करून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. रिकाम्या पोटी तिचे सेवन केल्याने पचन सुधारते आणि यकृताचे कार्य चांगले राहते.brees
तुळशीची पाने पाचक एन्झाईम्स वाढवून गॅस, फुगणं आणि अपचन दूर करतात. रोज सकाळी सेवन केल्याने पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
तुळस एक दाहक-विरोधी वनस्पती आहे. त्यामुळे रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने खोकला, दमा आणि सायनस सारखे आजार कमी होतात.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी तुळस एक उत्तम औषधी वनस्पती आहे. ती कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब पातळी कमी करण्यास मदत करते.
तुळस इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करत. त्यामुळे रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास नैसर्गिकरित्या मदत होते.
सकाळी तुळशीची ताजी पाने खाल्ल्याने कोर्टिसोलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते, तसेच दिवसभर शांत आणि अधिक लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.