सकाळ डिजिटल टीम
पंजाब किंग्ज संघाने गुजरात टायटन्सविरूद्धचा पहिला सामना जिंकला आणि आयपीएल २०२५ हंगामाला विजयी सुरूवात केली.
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २४३ धावा उभारल्या अन् गुजरातला २३२ धावांवर रोखत सामना जिंकला.
सामन्यात श्रेयस अय्यरने सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली. संधी असतानाही त्याने शतक पूर्ण केले नाही.
स्ट्राईकला असलेल्या शशांक सिंगला त्याने खेळत राहायला सांगितले.
शशांकने अंतिम षटकात ५ चौकारांसह २३ धावा कुटल्या. त्याने ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १६ चेंडूत ४४ धावा उभारल्या.
त्याच्या या स्फोटक खेळीचे पंजाबच्या विजयात महत्त्वाचे योगदान आहे.
पण तुम्हाला माहित आहे का? शशांक सिंग एका IPS अधिकाऱ्याचा मुलगा आहे.
त्याचे वडिल आयपीएस शौलेश सिंग नुकतेच निवृत्त झाले.
शशांक सिंगने मागील आयपीएल हंगाम गाजवला आणि या हंगामालाही त्याने दमदार सुरूवात केली.