फक्त 5 सेकंदांची ट्रिक! असली केशर ओळखण्याचा एक्स्पर्ट फॉर्म्युला

Aarti Badade

केशर : सर्वात महागडा मसाला

केशर (Saffron) हा त्याच्या खास सुगंध, रंग आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. मात्र, उच्च किंमतीमुळे बाजारात नकली केशर मोठ्या प्रमाणात विकले जाते.

Saffron Purity Test

|

Sakal

पाणी किंवा दुधाची चाचणी

असली केशर ओळखण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. एक-दोन धागे गरम पाणी किंवा कोमट दुधात टाका.

Saffron Purity Test

|

sakal

रंगाची वेळ

असली केशर आपला रंग हळू हळू (Gradually) सोडते. नकली केशर पाण्यात टाकल्याबरोबर त्वरित गडद लाल किंवा नारंगी रंग सोडते (कारण त्यावर कृत्रिम रंग असतो).

Saffron Purity Test

|

Sakal

चव आणि वासाने ओळखा

खऱ्या केशरचा वास तीव्र, गोड आणि मधासारखा असतो. नकली केशराला कृत्रिम सुगंध असतो किंवा वास येत नाही.

Saffron Purity Test

|

Sakal

चव कशी असते?

असली केशरची चव नेहमी कडू (Bitter) आणि थोड्या प्रमाणात तुरट असते. जर केशर गोड (Sweet) लागत असेल, तर ते नकली आहे, कारण त्याला साखरेच्या पाकात बुडवलेले असू शकते.

Saffron Purity Test

|

Sakal

पोत आणि टेक्स्चर

खऱ्या केशराचे धागे (Threads) थोडे पिळलेले आणि स्पर्शाला खरखरीत (Slightly Rough) दिसतात. बनावट केशर गुळगुळीत आणि सरळ दिसते.

Saffron Purity Test

|

Sakal

पेपर चाचणी

पांढऱ्या कागदावर केशरचे धागे ठेवून त्यावर थोडे पाणी टाका. नकली धाग्यांनी लगेच गडद लाल रंग सोडला आणि कागदावर डाग पडला, तर ते नक्कीच नकली आहे.

Saffron Purity Test

|

Sakal

किडनी फेल्युअरचा वाढता धोका! CKD कसं हळूहळू शरीरावर ताबा मिळवतं?

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

येथे क्लिक करा