पलक तिवारी ज्याच्यावर फिदा, तो वेदांग रैना कोण?

प्रणाली मोरे

इंटरनेट सेन्सेशन पलक तिवारी(Palak Tiwari) आपल्या ग्लॅमरस लूकसोबतच अफेअर्समुळेही चर्चेत पहायला मिळते. खूप कमी वेळात इंडस्ट्रीत तिची चर्चा व्हायला सुरुवात झाली. त्यात तिची आई प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी असल्यामुळंही ती लगेच प्रकाशझोतात आली.

Esakal

काही दिवसांपूर्वीन तिचं नाव सैफचा मुलगा इब्राहिम अली खान सोबत जोडलं गेलं होतं. इब्राहिमसोबत असताना कारमध्ये चेहारा लपवतानाचा तिचा व्हिडीओे तेव्हा जोरदार व्हायरल झाला होता.

Esakal

पण आता पलकच्या बाबतीत नवी बातमी कानावर पडतेय की, अभिनेत्री आता इब्राहिम अली खानला नाही तर जोया अख्तरच्या द आर्चीज सिनेमातील एका स्टारला डेट करतेय.

Esakal

'द आर्चिज' सिनेमातील वेदांग रैनावर पलक तिवारीचं मन जडलंय अशी चर्चा आहे. जेव्हापासून ही बातमी वाऱ्यासारखी पसरलीय तेव्हापासून जो-तो वेदांग रैना कोण आहे याविषयी जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी सर्च करताना दिसत आहे.

Esakal

वेदांग रैना हा नवोदीत अभिनेता आहे. तो जोया अख्तरच्या बहुचर्चित 'द आर्चीज' सिनेमातून पदार्पण करतोय. वेदांगची झलक आपल्याला 'द आर्चीज'च्या पहिल्या टीझरमधून दिसली असेलच.

Esakal

वेदांग हा केवळ अभिनेता नाही तर गायक आणि मॉडेल देखील आहे. त्यानं गायक म्हणूनच आपल्या करिअरला सुरुवात केली होती. बॉलीवूडच्या हॅन्डसम हंकमध्ये तो सामिल होण्यास सज्ज आहे हे त्याचं इन्स्टा अकाऊंट चेक केल्यावर कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal