ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

मुंबई, ता. 20 : मुंबईत आज 1,090 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,44,262 झाली आहे. मुंबईत आज 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,821 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,470 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,14,375 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे...

पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.20) दिवसभरात 745 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 328 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत एकूण 6 हजार 77 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज 1 हजार 895 कोरोनामुक्त झाले असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याच्या बातम्या...

कोल्हापूर ः जिल्ह्यात गेल्या 24 तासांत फक्त 51 व्यक्ती कोरोनाबाधित तर 153 जण कोरोनामुक्‍त झाले. 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात 1 हजार 959 बाधितांवर उपचार सुरू आहेत. बाधितांची संख्या 47 हजार 478 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 43 हजार 912 झाली आहे. आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार...

राशिवडे  बुद्रुक : आज दुपारी येळवडे, पुंगाव. शिरगाव आणि धामोड परिसरामध्ये अक्षरश: ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. केवळ 70 मिनिटात या परिसरात 110 मिलिमीटर पाऊस झाला. अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. पावसाची आक्रमकता पाहून तुळशी धरणातून 749 क्यूसेक पाण्याचा विसर्ग...

कोल्हापूर ः लक्ष्मीपुरीतील प्रफुल्ल लॉजवर सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्यांसह लॉजमालक व्यवस्थापक अशा 11 जणांवर गुन्हा दाखल केला. कारवाईत 48 हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी : मुझफर साहेबजी मुल्ला (...

नागपूर  ः बहुप्रतीक्षित नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज प्रकल्प पूर्णत्वास आला असून व्यावसायिक वापरही सुरू झाला आहे. अलीकडेच या मार्गवरून पहिली मालगाडी धावली. या सेवेमुळे दोन्ही राज्यांमधील शेतकरी व व्यावसयिकांना लाभ मिळणार आहे. मालगाडीच्या यशस्वी फेरीमुळे नवीन वर्षात या मार्गावरू प्रवासी रेल्वे...

मुंबई, ता. 20 : राज्याचे पर्यारवण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे कारशेड जागेचा आज आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर कारशेडचा आढावा घेताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी देखील होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच आरेमधील...

आर्णी ( जि. यवतमाळ) : शेतातील सोयाबीन काढणी केल्यावर गंजी लावत असताना वीज कोसळल्याने युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, तिघे जखमी झाले. ही घटना तालुक्‍यातील आयता (हेटी) येथे सोमवारी (ता.19) दुपारी पाचच्यादरम्यान घडली. तेजस नागोराव मेश्राम (वय 18, रा. आयता (हेटी)) असे मृताचे नाव आहे. अधिक...

मुंबई,ता.२०: कॉनफेर्डेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या वतीने मुंबईतील कोविड संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौरव करण्यात आला. (CII) सीआयआयच्या पश्‍चिम विभागाच्या आरोग्य टास्क फोर्सचे प्रमुख जॉय चक्रबर्ती यांनी आज प्रशिस्त पत्रक...

अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील टाकळगाव (का.) येथे दोघा सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.१९) दुपारी दोनच्या सुमारास घडली. रोहन राम वडमारे (वय १८) व रोहित राम वडमारे (वय १६, रा. रामनगर, औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या...

हुपरी : पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रतापसिंह अप्पासाहेब देसाई यांची निवड झाली. पालिकेच्या आज झालेल्या ऑनलाईन विशेष सभेत ही निवड केली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट होत्या. देसाई यांची आमदार प्रकाश आवाडे प्रणीत ताराराणी जिल्हा विकास आघाडीच्या कोट्यातून निवड झाली आहे. ...

नाशिक/येवला : यंदा कांद्याच्या रोपांचे प्रचंड नुकसान झाल्याने बियाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे विक्रेत्यांकडेही मुबलक प्रमाणात बियाणे मिळत नसल्याने आणि ते बियाणे वाढीव दराने विक्रीच्या तक्रारी होत आहेत. यासंदर्भात कृषी विभागाला शहरातील मुख्य दोन विक्रेते दोषी आढळल्याने त्यांच्यावर...

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत मंगळवारी सकाळी सर्व्हर हँग झाल्याने, परीक्षा काही काळासाठी थांबली होती. मात्र एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी लॉगइन केल्याने, ही समस्या निर्माण झाली, हे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले असून यावर उपाय म्हणून मंगळवारी...

मुंबई, ता.20 : फेक टीआरपीप्रकरणी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे. दरम्यान रिपब्लिक वाहिनीच्या तीन अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने समन्स पाठवले असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आहे आहे. दिनेश विश्वकर्मा ( वय 37 वर्षे ) आणि रामजी...

नागपूर ः  मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या व माहिती अधिकार कार्यकर्त्या अ‍ॅड. अंकिता शाह यांना लकडगंज पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आल्याचा प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समज देण्यात आली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षकास १ हजार रुपयांचा दंड का...

औरंगाबाद : सांस्कृतिक वारसा असलेले संत एकनाथ रंगमंदिर नूतनीकरणासाठी महापालिकेने बंद केले आहे. कोरोना विषाणूमुळे नाट्यगृह सध्या बंद असले तरी नव्या वर्षात म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये नवे रंगमंदिर नाट्यप्रेमींसाठी खुले होण्याची शक्यता आहे. नूतनीकरणाचे काम सध्या अंतिम टप्यात आले आहे. ...

नाशिक : एकीकडे जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळणार्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत असतांना, कोरोनाच्‍या बळींचे प्रमाण गेल्‍या काही दिवसांत घटल्‍याची दिलासादायक स्‍थिती आहे. मंगळवारी (ता.२०) नाशिक महापालिका हद्दीत एकाही रूग्‍णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला नाही. तब्‍बल १४२ दिवसांनंतर शहरात दिवसभरात...

यवतमाळ : यवतमाळ येथील स्कुल ऑफ स्कॉलर्सचा दहावीतील विद्यार्थी अनिकेत प्रशांत काकडे याला केंद्र सरकारचा 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड २०२०' घोषित झाला असून यवतमाळच्या शिरपेचात अनिकेतने मानाचा तुरा खोवला आहे. अनिकेतने कोविड-१९ पासून संरक्षण...

नागपूर : ती सहा महिन्यांची गर्भवती... दारुड्या पतीचा जाच असह्य झाल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली... परंतु त्याने कसलाही विचार न करता घरातून हाकलून दिले... बुटीबोरीतील भल्या महिलेने तिच्या खानावळीत आश्रय दिला... प्रसूतीनंतर पुनर्जन्म आश्रम गाठले... परंतु आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी...

लातूर : विजेची चोरी करून नियमित बिले भरणाऱ्या ग्राहकांची अडचण करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या निलंगा विभागाने कारवाई केली. विभागातील औसा, निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील ३३ गावांत मोहीम राबवत ५३६ जणांविरुद्ध विजेच्या चोरी प्रकरणी कारवाई केली. मोहिमेत शेगडी, हिटरसह वीज तारांवर आकडे टाकण्यासाठीची...

नाशिक/येवला : मंगळवारी (ता.२०) मध्यरात्री ते पहाटे दरम्यान तालुक्यातील रहाडी व खरवंडी येथे अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९ ठिकाणी घरफोड्या करत धुमाकूळ घालत रोख रक्कम, सोने चांदीचा ऐवज, मोबाईल संच आणि दुचाकी असा ऐवज चोरून नेला आहे. पोलिसानी यातील सात चोऱ्यांचे गुन्हे दाखल केले आहेत.  रहाडी...

आडूळ (औरंगाबाद) : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (ता.२०) पाहणी दौरा केला. त्यांनी पैठण तालुक्यातील मुरमा व औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगावात बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी शासन...

नाशिक : कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी शासकीय स्‍तरावर विविध सावधगिरीच्‍या उपाययोजना बंधनकारक केलेल्‍या आहेत. याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्‍कचा वापर करणे आवश्‍यक आहे. मात्र निष्काळजीपणाने फिरणाऱ्या व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन...

चिपळूण - महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याअगोदरच त्यांची बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजपचे शहराध्यक्ष अशिष खातू यांनी दिली.  महाविकास आघाडी व भाजप नगरसेवकांमध्ये गेल्या काही...

#OpenSpace

बीजिंग- वार्षिक मलबार नौदल सरावात सहभागी होण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या घोषणेची दखल घेतल्याचे चीनतर्फे मंगळवारी सांगण्यात आले. भारत,...

मुंबई : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना...

लाहोर- पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ पक्षाचे प्रमुख तसेच संसदेतील विरोधी पक्षनेते शाहबाझ शरीफ यांची मनी लाँडरिंग प्रकरणी मंगळवारी...