'या' फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत कधीच 'षटकार' ठोकला नाही!

सकाळ डिजिटल टीम

कॅलम फर्ग्युसन (Callum Ferguson) - ऑस्ट्रेलियन फलंदाजानं एकदिवसीय कारकिर्दीत एकही षटकार मारलेला नाहीय, हे ऐकून थोडं विचित्र वाटेल. पण, हे खरं आहे. फर्ग्युसननं ऑस्ट्रेलिया संघासाठी (Australia Cricket Team) एकूण 30 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान फर्ग्युसननं 40 पेक्षा जास्त सरासरीनं 663 धावा केल्या, ज्यात 5 शतकांचा समावेश आहे. पण, कधीही सिक्स मारला नाही. फर्ग्युसन हा संथ फलंदाज नव्हता, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 85 इतका आहे.

थिलन समरवीरा (Thilan Samaraweera) - श्रीलंका क्रिकेट संघाच्या (Sri Lanka Cricket Team) या दिग्गज उजव्या हाताच्या फलंदाजानं आपल्या संपूर्ण एकदिवसीय कारकिर्दीत एकही शतक झळकावलं नाहीय. समरवीरानं 53 वनडे खेळले. या कालावधीत खेळलेल्या 42 डावांमध्ये त्यानं 27.80 च्या सरासरीनं 862 धावा केल्या. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत त्यानं दोन शतकंही झळकावली. पण, एकही षटकार मारला नाही. समरवीरानं वनडे क्रिकेटमध्ये 76 चौकार मारले आहेत.

मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) - मॅच फिक्सिंगच्या वादामुळं क्रिकेट सोडलेल्या मनोज प्रभाकरनं भारतासाठी 130 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान प्रभाकरनं अनेकवेळा भारतासाठी (Indian Cricket Team) सलामी दिली. पण, त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला एकही षटकार मारता आला नाही. प्रभाकरनं 98 डावात 24.12 च्या सरासरीनं 1858 धावा केल्या. प्रभाकरनं या काळात दोन शतकं आणि 11 अर्धशतकं झळकावली.

जेफ्री बॉयकॉट (Jeffrey Boycott) - इंग्लंडचा (England Cricket Team) माजी फलंदाज जेफ्री बॉयकॉटला त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत एकही षटकार मारता आला नाहीय. बॉयकॉट हा कसोटीतील महान फलंदाजांपैकी एक आहे. त्यानं इंग्लंडकडून 36 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं 36.06 च्या सरासरीनं 1082 धावा केल्या. बॉयकॉटनं 1 शतक आणि 9 अर्धशतकंही झळकावली. मात्र, संपूर्ण कारकिर्दीत षटकार मारता आला नाहीय.

डियोन इब्राहिम (Dion Ibrahim) - झिम्बाब्वेचा (Zimbabwe Cricket Team) माजी फलंदाज डियोन इब्राहिमनं त्याच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कधीही षटकार मारलेला नाहीय. त्यानं 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये 20.61 च्या सरासरीनं 1443 धावा केल्या. यादरम्यान डियोननं 1 शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली. इब्राहिमची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 121 होती. त्याच्या कारकिर्दीत त्यानं 104 चौकार मारले. मात्र, एकही षटकार मारता आला नाहीय. झिम्बाब्वेच्या कलात्मक फलंदाजांच्या यादीत इब्राहिमची गणना होते. झिम्बाब्वेच्या या फलंदाजाची खेळण्याची शैली खूपच वेगळी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Callum Ferguson