Diwali Padwa 2026 Wishes in Marathi: पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण! दिवाळी पाडव्यानिमित्त तुमच्या जोडीदाराला द्या प्रेमळ शुभेच्छा संदेश

Anushka Tapshalkar

BALIPRATIPADA 2026 SPECIAL WISHES IN MARATHI: दिवाळीचा उत्साह, नात्यांमधील गोडवा आणि नव्या सुरुवातीचा आनंद घेऊन येणारा सण म्हणजे दिवाळी पाडवा! कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा हा दिवस विशेषतः पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ करणारा मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते, तर पती तिला प्रेमाची भेट देऊन हा दिवस खास बनवतो. अशा मंगलमय प्रसंगी आपल्या प्रियजनांना पाठवा प्रेम, आनंद आणि सुखसमृद्धीने भरलेल्या दिवाळी पाडव्याच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!

  • पणतीचा उजेड अंगणभर पडू दे... तुझा सहवास जन्मभर राहू दे. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे… दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • संसारात प्रेमाची गोडी, नात्यांत विश्वासाची ओढ... दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

  • कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • माझ्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या आणि प्रत्येक वळणावर माझी साथ देणाऱ्या माझ्या आयुष्याच्या साथीदाराला दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

  • साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे... सुखद ठरो हा छान पाडवा... दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • नात्यात आपुलकी वाढू दे, सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा… दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • तुमच्या जीवनात सुखसमृद्धीचा दीप सदैव तेवत राहो! बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • दिवाळी पाडव्याचा हा पवित्र सण तुमच्या संसारात प्रेम, विश्वास, आपुलकी घेऊन येवो. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • धनाटी पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन… दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • नव्या स्वप्नांना नवी उमेद मिळू दे, प्रत्येक प्रयत्नाला यशाची साथ लाभू दे… तुमच्या आयुष्यात आनंदाची बरसात होवो, दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

  • प्रेमाच्या नात्याला विश्वासाची जोड मिळो, सुखाच्या क्षणांनी आयुष्याचं आभाळ भरून जावो… दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

  • सोन्यासारखी चमक तुमच्या नशिबात येऊ दे, प्रत्येक दिवस आनंदाचा आणि प्रत्येक क्षण समाधानाचा ठरू दे… बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

  • सुखाची रांगोळी दारात सजू दे, समृद्धीची पावलं घरात पडू दे, नात्यांमधील गोडवा असाच कायम राहू दे… दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.