सकाळ डिजिटल टीम
दोन गाड्यांची तोडफोड
पुण्यात मध्यवर्ती भागात भांडणातून दोन गाड्यांची तोडफोड
नारायण पेठेत भर गर्दीच्या ठिकाणी घडली घटना
हत्याराने वार करत एक जण जखमी
विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल
गडचिरोली, ता.५ : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे गुरुवार (ता. ७) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. शालेय शिक्षण मंत्री भुसे यांचे गुरुवारी सकाळी १० वाजता गडचिरोली येथे आगमन होमार आहे. १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा व मार्गदर्शन करतील. दुपारी १.३० वाजता शासकीय वाहनाने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
भंडारा, ता. ५ ः तुमसर तालुक्याच्या देव्हाडी येथील १५ वर्षे सात महिन्याच्या मुकबधीर मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार तुमसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रज्वल नरसिंग उपराडे असे अपृहत मुलाचे नाव असून, ३ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपासून तो बेपत्ता आहे. फिर्यादी प्रफुल नरसिंग उपराडे (वय २०, रा. देव्हाडी) याच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अलीप करीत आहेत.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस नदी नाल्यांना महापूर
नांदेडचे दहा पर्यटक अडकले, सुखरूप ठिकाणी पोहोचण्यासाठी पंचवीस किलोमीटरचा केला पाईप्रवास.
दहा पैकी 7 प्रवासी एका ठिकाणी तर 3 प्रवासी दुसऱ्या ठिकाणी
खारघरमध्ये पुन्हा मराठी आणि हिंदी भाषा वाद उफाळला आहे.
परप्रांतीय दुकानदार आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला वाद.
परप्रांतीय दुकानदाराचा वर्गणी देण्यास नकार देत मराठी माणसामुळे आमचं दुकान चालत नाही म्हणत केली चिथावणी.
मराठी बोलणार नाही आणि शिकणार नाही, म्हणत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर केली मुजोरी.
मनसे कार्यकर्त्यांनी उतरवला परप्रांतीय दुकानदाराचा माज.
परप्रांतीय दुकानदाराने मागितली माफी.
वडवणीत बॅनर वॉर सुरु झालं असून एकीकडे प्रकाश सोळंके गटाचे बॅनर झळकत आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडे गटाचे बॅनर झळकत आहेत. दोन्ही बॅनर्सवर पक्षातीलच त्या-त्या वरिष्ठांचे फोटो डावलण्यात आलेले आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ८० टक्के रिक्त केंद्रप्रमुख पदे भरतीसाठी शासनाने निर्णय घेतला आहे. ता.१८ जुलै २०२५ रोजी नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता ५० टक्के जागा सरळसेवेतील परीक्षेद्वारे, तर उर्वरित ५० टक्के जागा सेवा ज्येष्ठतेनुसार प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांमधून भरल्या जाणार आहेत.
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळात २०१५ पासून हंगामी शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असलेले बीड जिल्ह्यातील कै. हनुमंत खरमाटे यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिक्षकवर्ग हळहळला होता. या दु:खाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांच्यासह अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी खरमाटे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत एक सामाजिक आदर्श घालून दिला आहे. महापालिकेच्या शिक्षकांनी खरमाटे यांच्या कुटुंबियांना २ लाख ६५ हजार ६४१ रुपयांची निधी उभारत मदत केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात आणि अधिकाऱ्यांविरोधात कोपरखैरणे इथे माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे आणि स्थानिक नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलेला आहे यामध्ये पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा, गार्डनचे दुरावस्था, अनाधिकृतपणे बांधकाम अनाधिकृतपणे फेरीवाले अशा अनेक समस्यांसाठी कोपरखैरणे येथे साखळी उपोषणाला माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू आहे.
धुळे शहरात सिंधी कॅम्प येथील सदाशिव फूड्स या पोंगे व कुरकुरे बनवण्याच्या कंपनीला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे, यासंदर्भातील माहिती अग्निशमन विभागास दिल्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, व मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले आहे.
२७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला राज्यात सुरुवात होणारे पण तत्पूर्वी पुण्यात चर्चा रंगतेय ती म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीची. पुणे पोलिसांनी आज पोलिस आयुक्तालयात मानाचे गणपती मंडळलं आणि शहरातील इतर मंडळांसोबत बैठक केली. यावेळी शहरातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीबाबत त्यांच्या हरकती आणि सूचना पोलिसांकडे नोंदवल्या. दुसऱ्या बाजूला, मानाचे गणपती मंडळांनी सुद्धा पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा केली. सगळ्या मंडळांसोबत समन्वय ठेवून चर्चा करून निर्णय होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली
नाशिकच्या मालेगाव मध्ये एका चोरट्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाल्याची घटना घडली आहे,छावणी पोलिसांनी सकाळी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात नांदगाव येथील नवनाथ पवार या संशयिताला पकडून आणले,त्याने 10 ते 12 मोटरसायकल चोरल्याचा संशयावरून त्याला पडून छावणी पोलीस स्टेशन मध्ये बसवले होते मात्र पोलिसांना चकमा देत तो फरार झाला,पोलिसांनी सिनेस्टाईल त्याचा पाठलाग करत त्याला जेरबंद केले, पोलीस स्थानकातून चोरटा फरार झाल्याची चर्चा मात्र चांगलीच रंगली.
वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची पुरती दुरवस्था झालीय. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहनं चालवणही कठीण होऊन बसलय. मात्र या खड्डेमय रस्त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केलय.
छत्रपती संभाजीनगर म्हाडाकडून सोडत जुन-२०२५ अन्वये १३४१ निवासी सदनिका भुखंड व नाशिक मंडळातील ६७ सदनिका असे १४०८ सदनिका भुखंडाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्जदारांना 31 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा करून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. प्राप्त होणाऱ्या अर्जांची 26 सप्टेंबर, 2025 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली.
ऐन पावसाळ्यात लंपी आजाराने तोंड वर काढले आहे . पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात सध्या सर्वाधिक जनावरांशा लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे.
माळशिरस मध्ये 132 तर पंढरपुरात 68 जानवारांना लंपी आजाराची लागण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात 1 हजार 544 जनावरे लंपी आजारामुळे बाधित झाले आहेत.
यामध्ये 1 हजार 108 जनावरे बरी झाली आहेत. तर 33 जनावरे दगावली आहेत.
सध्या 403 जनावरांवर उपचार सुरू आहे. यामध्येच माळशिरस आणि पंढरपुरातील सर्वाधिक जनावरे लंपी आजाराने बाधित झाली आहेत.
पशुसंवर्धन विभागाने उपाय योजना म्हणून लसीकरण मोहिम सुरू केली आहे.
जो नेता २९ ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाडा अस आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते सध्या गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे,. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे.
सोलापुरात चोरीचे प्रमाण वाढले असून, शहरात पहाटेच्या सुमारास चोर टोळ्या दहशत पसरवत विविध ठिकाणी चोरी करत आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात १,७०० रुपयांनी वाढ झाली असून सोने पुन्हा एक लाख पार गेले आहे. सोन्याच्या भावात १ हजार ७०० रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर १ लाख २०० रुपयांवर पोहोचले. चांदीच्याही भावात १ हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर १ लाख १३ हजार रुपयांवर पोहोचले आहे.
महादेवी हत्तीण परत आली पाहीजे ही सर्वांची इच्छा, मठाने याचिका दाखल करावी , सोबत सरकारही याचिका दाखल करणार – मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस
राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत आहे. माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आणि सरकारही बाजू मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले.
पुण्यातील गणेश मंडळांची बैठक सुरू झाली आहे.ज्या मंडळांची हरकत आहे त्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. दुपारी १ वाजता मुख्य म्हणजेच मनाचे पाच गणपती मंडळ आणि इतर सहभागी होणार आहे. नंतर सगळ्यांची एकत्रित बैठक देखील होणार. पुणे पोलीस आयुक्तांसह, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सगळ्या परिमंडळांचे उपायुक्त देखील उपस्थित आहेत.
काही खरेदी केंद्रांवर नियम धाब्यावर – निकृष्ट कांद्याची खरेदी सुरूच!
खरेदी केलेल्या आणि प्रत्यक्ष साठवलेल्या कांद्याच्या प्रमाणात मोठा फरक!
चांगल्या प्रतीचा कांदा दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट कांद्याची खरेदी – फसवणुकीचा प्रकार?
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही नाफेड व NCCFच्या खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहाराची पुनरावृत्ती?
कोट्यवधींचा घोटाळा समोर आल्यावरही यंत्रणा अजूनही गाफील?
नियमांचा भंग करत, कमी दर्जाचा कांदा उचलून शेतकऱ्यांच्या अपेक्षांना तडा?
पुणे पोलिस आयुक्तालयात गणेश मंडळांची बैठक सुरू
बैठकीला शहरातील प्रमुख गणेश मंडळांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत
या बैठकीनंतर पुण्यातील मानाच्या गणपतींच्या गणेश मंडळांची बैठक होणार
गणेश मंडळांच्या समस्या, सूचना या बैठकीत येणार चर्चेला
गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा होणार
मानाच्या गणपती पुर्वी अनेक गणेश मंडळ सकाळी ७ वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याची तयारीत
मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि एमएमआर क्षेत्रातील महापालिका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज साडेबारा वाजता होणार आहे. शिंदे गटाच्या प्रभावाखाली असलेल्या या भागात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासाठी ही बैठक घेतली जात आहे. पक्षातील फुटीमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळत, आऊटगोइंग थांबवण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी ‘डॅमेज कंट्रोल’सुद्धा करण्यात येणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकांचा सविस्तर आढावाही घेतला जाणार आहे.
नांदणी येथील प्रिय हत्तीणी महादेवीच्या रवानगीविरोधात आज गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो ग्रामस्थ, नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गडहिंग्लजमधील दसरा चौकातून निघालेला मोर्चा घोषणाबाजी करत तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. महादेवीला स्थानिकांपासून दूर नेण्याच्या निर्णयाला विरोध करत ग्रामस्थांनी ती इथल्याच मंदिरात राहावी, अशी मागणी यावेळी केली.
पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनी थकित वेतनाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडले आहे. वेतन न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले असून मोठ्या संख्येने कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे रुग्णसेवा आणि आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
आरोग्य विभागाने वर्षभरापूर्वी तब्बल दीड ते पावणे दोन कोटी रुपये खर्चून घेतलेली बोट ॲम्बुलन्स बुडाली. नंदुरबार जिल्ह्यातल्या नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी बोट ॲम्बुलन्स तैनात होती. बोट अॅम्ब्युलन्स सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर धरण क्षेत्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने आरोग्य विभागाच्या बोट अॅम्ब्युलन्सच्या मागील भागाचा सुमारे 30 टक्के भाग पाण्याखाली गेला. ही परिस्थिती निर्माण होताच आरोग्य विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार असणारा लोगो लावल्याचा प्रकार समोर आलाय. आमदार नसतानाही गाडीवर आमदाराचा लोगो लावल्याने सोलापुर जिल्ह्यात चर्चेचा उधाण आलंय. उमेश पाटील यांच्या एम एच 04 एच डी 5565 या नंबरच्या गाडीवर सोलापुरातील विश्रामगृह येथे आमदाराचा लोगो असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील 288 विधानसभा सदस्य आणि 78 विधान परिषद सदस्यांना शासकीय कामासाठी गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा अधिकार आहे.
कोथरूड मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात मोठे अपडेट समोर आले आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून कोणता हलगर्जीपणा झालाय का याची चौकशी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलीय. या चौकशी अंती पोलिसांकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्या नसल्याचं एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अहवाल सादर करण्यात आला आहे. हे प्रकरण झाल्यानंतर पीडित महिलांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्याचा देखील अहवाल आज पुणे पोलिसांना मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मल्टिप्लेक्स मालकांची बैठक बोलावली आहे. मराठी चित्रपटांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
चीनने भारताची जमीन लाटल्याचा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला होता. तो योग्य आहे, असे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १७ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रभारी अपर जिल्हा दंडाधिकारी राहुल गायकवाड यांनी हे आदेश दिले आहेत.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन आणि १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाला हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आरोपी वाल्मीक कराडने आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी नसल्याचा अर्ज बीड विशेष न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. वाल्मिक कराडने आता वकिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली जाईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केली आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाज मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री शिरसाठ यांच्या झाले. यावेळी त्यांनी होलार समाज आर्थिक विकास महामंडळासाठी निधीची घोषणा केली. यावेळी मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.
कसबा बीड : येथे दरवर्षी मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो, अशी आख्यायिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. यावेळी येथील दोघांना सुवर्णमुद्रा सापडली आहे. मृगाचा पाऊस पडला की येथे कुठे ना कुठे तरी सोन्याची मुद्रा सापडतेच. यावेळी येथील आक्काताई आनंदा जाधव यांना त्यांच्याच ‘जाधव मळा’ नावाच्या शेतात सुवर्णमुद्रा सापडली. त्यांना निशिगंधाची भांगलण करत असताना त्यांना हा बेडा सापडला.
जयसिंगपूर : संवेदनशील आणि भावनिक प्रश्न बनलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी हत्तीणी’च्या गुजरातहून परतीच्या प्रवासासाठी कायदेशीर पेचातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ५) मुंबईत होणाऱ्या बैठकीत तीन मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न होणार आहे.
नवी दिल्ली : उत्तरेकडील राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात उत्तराखंडमधील तिघे जण वाहून गेले तर, हिमाचल प्रदेशातील तीन जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील तब्बल १३ जिल्ह्यांमध्ये पूर आला असून, राज्यातील गंगा, यमुना आणि बेतवा या नद्यांच्या पाणी पातळीत अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.
Latest Marathi Live Updates 5 August 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे स्पष्ट करतानाच २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार या निवडणुका होतील, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. तसेच भारतावर २५ टक्के आयातशुल्क लादणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शुल्कात आणखी वाढ करण्याचा इशारा दिला आहे. उत्तरेकडील राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. झारखंडच्या राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्त्व आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन (वय ८१) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने येथील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.