Ponniyin Selvan 2 पहायचा राहिलाय मग इथे पहा! या OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलिज, कमाईचा आकडा पाहून म्हणाल...

Vaishali Patil

आता 'पोन्नियिन सेल्वन-2' चे चाहते हा चित्रपट OTT पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ते या चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रतिक्षा करित आहेत. मणिरत्नम यांचा हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाचा पहिला भाग PS-1 आधीच OTT वर उपलब्ध आहे.

आता 'पोन्नियिन सेल्वन-2' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 28 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांना मोठी रक्कम देण्यात आली असल्याच बोलल जात आहे. PS 1 आधीपासून Amazon Prime वर हिंदीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आता 'पोन्नियिन सेल्वन-2' देखील Amazon Prime वर प्रदर्शित होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मल्टीस्टारर चित्रपट Ponniyin Selvan 2 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला, आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, जयराम, जयराम, एल.ए. नासार यांच्यासारख्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ज्याच्या अभिनयानं प्रेक्षकांना भारावुन टाकलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.