Google Maps Update: गूगल मॅपचं नवं फिचर, देणार हवामानाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

घरबसल्या जगातील कोणतेही लोकेशन बघायचे असेल तर गुगल मॅपला लोक पहिली पसंती देतात मात्र आता गुगल मॅपने एक नवीन फिचर आणले आहेत.

आता या फिचरमुळे गुगल मॅप द्वारे युजर्सला कोणत्याही हवामानाची माहिती घेणे सोपी जाणार.

हे फिचर Google Pixel फोन आणि Nest Hubs मध्ये आधीच उपलब्ध आहे. मात्र, आता गुगल मॅप्सने अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठीही हे खास फीचर सुरू केले आहे.

हे फिचर सुरु करण्यासाठई Google Maps च्या सेटिंग ऑप्शन वर जा, लेयर सेटिंगवर टॅप करा. यामध्ये Public transit, 3D, स्ट्रीट व्यू और आणि ट्रॅफिकचा पर्याय उपलब्ध असेल. यामध्ये, एयर क्वालिटी साठी एक पर्याय समावेश केला जाईल.

झूम आउट आणि इन करून तुम्ही एयर क्वालिटी तपासू शकता. स्थानिक AQI डेटा ऑन केल्यानंतर, तुमच्या लोकेशनची एयर क्वालिटी Google Map वर दाखवली जाईल.

आपल्याला पिन दिसतील जे आपल्याला एयर क्वालिटीबद्दल सांगतील. एयर क्वालिटीनुसार पिन्सचा रंगही बदलत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.