भारतातील सर्वात सुंदर 7 रेल्वे मार्ग

| Sakal

ट्रेनमधून प्रवास करताना खिडकीतून दिसणाऱ्या मनमोहक दृश्यांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते.

| Sakal

आज आम्ही तुम्हाला भारतातील काही सुंदर रेल्वे मार्गांबद्दल बोलणार आहोत, जिथून प्रवास करण्याचा वेगळाच आनंद असतो.

| Sakal

निलगिरी माउंटेन रेल्वे- 1908 मध्ये सुरु झालेली ही ट्रेन निलगिरी पर्वतमालेदरम्यान सुमारे 16 बोगद्यातून आणि 250 पुलांवरून प्रवास करते.

| Sakal

कोरापुट रायगडा रेल्वे मार्ग- ओडिशामधील हा रेल्वेमार्ग घनदाट जंगल आणि डोंगरातून जातो.

| Sakal

काश्मीर घाटी रेल्वे- तुम्ही आयुष्यात एकदातरी या ट्रेनचा अनुभव जरूर घ्यायला हवा. बर्फाने आच्छादलेल्या पर्वतरांगाचं दृश्य मनाला सुखावतं.

| Sakal

जोधपूर-जैसलमेर रेल्वे- सुमारे 285 किमीचा हा रेल्वेमार्ग डेजर्ट सफारीचा आनंद देण्यासाठी ओळखला जातो.

| Sakal

केरळ- प्राकृतिक सौंदर्यासाठी केरळ प्रसिद्ध आहे. येथील एर्नाकुलम, कोल्लम, त्रिवेंद्रम रेल्वे मार्ग तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्वोत्तम रेल्वे प्रवासाची अनुभूती देतो.

| Sakal

दार्जिलिंग टॉय ट्रेन- भारतातील सर्वात जुन्या पर्वतीय रेल्वेमार्गांपैकी एक असलेला हा मार्ग न्यू जलपाईगुडीपासून सुरु होतो. चहाचे मळे, उंच पर्वत आणि घनदाट जंगलाचं दृश्य आपल्याला पाहता येते.

| Sakal

गोवा- गोवा आणि कर्नाटक सीमेवर स्थित दूधसागर वॉटरफॉलजवळून जाणारा रेल्वेमार्ग मोहक सुखाची अनुभूती देतो.

| Sakal
| Sakal