'या' कारणांमुळे विजय देवरकोंडा तरुणींकडून होतोय सर्वाधिक सर्च!

| Sakal

विजय देवरकोंडा हा तेलुगु अभिनेता (Telugu Actor Vijay Devarkonda) असूनही त्याच्या विविध भाषांमध्ये डबिंग झालेल्या चित्रपटांमुळे तो देश-विदेशात प्रसिद्ध झाला. (A brief introduction of Vijay Devarkonda, the most beloved actor among the youth)

| Sakal

विजयचा पहिला तेलुगु चित्रपट होता रोमॅंटिक कॉमेडी 'नुव्विला' (2011). त्याचा दुसरा चित्रपट होता "येवडे सुब्रह्मण्यम', जो 2015 मध्ये रिलीज झाला व त्यात त्याने को-स्टारची भूमिका निभावली होती.

| Sakal

मात्र, 2016 च्या रोमॅंटिक कॉमेडी 'पेल्ली चोपुलु' चित्रपटामध्ये विजयने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याचा 'अर्जुन रेड्डी' (2017) हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्याच्या अभिनयामुळे त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

| Sakal

2018 मध्ये 'महानती' चित्रपट व त्याच वर्षी 'गीता गोविंदम' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात नायिकेच्या भूमिकेत होती रश्‍मिका मंदान्ना. ही जोडी खूपच लोकप्रिय ठरली.

| Sakal

'टॅक्‍सीवाला' (2018) चित्रपटानंतर विजयने रश्‍मिका मंदान्नासोबत 'डियर कॉम्रेड' चित्रपट केला ज्यात या दोघांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

| Sakal

चित्रपटांव्यतिरिक्त विजय देवरकोंडाची पर्सनॅलिटी ही सुद्धा त्याच्या यशस्वितेचा स्ट्रॉंग फक्‍ट आहे.

| Sakal

विजयच्या फॅन्स लिस्टमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याची पर्सनॅलिटी, त्याचा रोमॅंटिक लूक, ऍक्‍शन थ्रिलरमुळे तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

| Sakal

Google च्या वार्षिक अहवालानुसार, विजय देवरकोंडा हा 2019 मध्ये सर्वाधिक सर्च झालेला दक्षिण भारतीय अभिनेता होता. अन्‌ विशेष म्हणजे तरुणींना सर्वाधिक आवडणाऱ्या सध्याच्या टॉप अभिनेत्यांमध्ये विजयचा क्रमांक वरचा लागतो.

| Sakal

विजयच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ व फोटोंवरून त्याचे फॅन्स त्याच्या आगामी चित्रपटांचा अंदाज लावत असतात. विजयचा 'लायगर' हा चित्रपटही या वर्षी प्रदर्शित होत आहे.

| Sakal