आमिर खान(Aamir Khan) मोठ्या कालावधीनंतर 'लाल सिंग चड्ढा'(Lal Singh Chaddha) सिनेमा घेऊन आपल्या चाहत्यांच्या भेटीस येत आहे.
आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर प्रेक्षकांच्या त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
'लाल सिंग चड्ढा' सिनेमाच्या निमित्तानं आमिरनं एका मुलाखतीत आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी घडलेली एक घटना सांगितली अन् त्याची चर्चा सुरु झाली.
वयाच्या १९ व्या वर्षी आमिर खान एका मुलीच्या प्रेमात वेडा झाला होता. इतका की तिनं नकार दिल्यावर त्यानं रागाने डोक्यावरचे केस कापून चक्क टक्कल केलं होतं. त्यावेळी तो 'होली' नावाचा सिनेमा शूट करीत होता. त्याला पाहून दिग्दर्शक केतनला धक्का बसला होता.
आमिर म्हणाला,'' तो वेडेपणा होता. पण त्यानंतर माझी पहिली पत्नी रिना दत्तालाही मी माझ्या रक्तानं चिठ्ठी लिहिली होती,जे तिला मुळीच आवडलं नव्हतं''.
आमिरनं रिना दत्ता हिला घटस्फोट दिल्यावर किरण रावशी लग्न केलं. पण तिलाही त्यानं पंधरा वर्षांनी २०२१ मध्ये घटस्फोट दिला.
आमिरला रिना दत्तापासून आयरा व जुनैद ही दोन आणि किरण राव पासून आझाद खान-राव अशी एकूण तीन मुलं आहेत.
आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. सिनेमा ११ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. हॉलीवूडच्या 'फॉरेस्ट गम्प' सिनेमाचा हा रीमेक आहे.