प्रकाश झा दिग्दर्शित मालिका आश्रमचा तिसरा भाग प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यात अभिनेत्री त्रिशा चौधरीची पुन्हा चर्चा सुरु झालीय.
गेल्या दोन्ही सीझनमध्ये त्रिशानं साकारलेली बबिता ही चाहत्यांचे लक्ष वेधून गेली होती.
बबिता या नावानंच त्रिशाला ओळखलं जाऊ लागलं. आश्रममध्ये बॉबी देओलची सेवक म्हणून त्रिशानं भूमिका केली आहे.
सोशल मीडियावर त्रिशाचा चाहतावर्ग मोठा आहे. आश्रममुळे ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे.
त्रिशाला आपल्याला एवढी मोठी भूमिका मिळेल आणि त्यातून लोकप्रियता होईल असे वाटले नव्हते. आश्रमनं तिला मोठा ब्रेक दिला आहे.
आता आश्रम प्रदर्शित होण्यापूर्वीच तिचा एक हॉट अंदाज व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.