काश्मिरचं घर स्फोटात उद्ध्वस्त, पण कुणाल खेमू मात्र खूश?

| Sakal

२५ मे हा कुणाल खेमूचा(Kunal Kemmu) जन्मदिवस(Birthday). बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात केलेला कुणाल आज सिल्व्हर स्क्रिनपेक्षाही OTT प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज करण्यात अधिक बिझी आहे. त्याच्या 'अभय'(Abhay3) या वेबसिरीजला अधिक पसंती मिळाली आहे.

| Sakal

'राजा हिंदुस्थानी' या आमिर खानच्या ब्लॉक बस्टर सिनेमातून भूमिका साकारल्यानंतर कुणाल खेमू बालकलाकार म्हणून अधिक प्रसिद्ध झाला.

| Sakal

खूप कमी लोकांना माहित आहे की कुणाल खेमू हा काश्मिरी पंडित(Kashmiri Pandit) आहे. त्यावेळी १९८९ मध्ये काश्मिरच्या खोऱ्यात झालेल्या नरसंहारात त्याचं कुटुंब देखील सापडलं होतं.

| Sakal

तेव्हा झालेल्या धमाक्यात कुणालचं काश्मिरमधील घर काश्मिरचं घर स्फोटात उद्ध्वस्त झालं होतं. टि.व्ही वर धमाक्यात कुणालचं मोडलेलं घर दाखवण्यात आलं. पण हे पाहून सात-आठ वर्षाचा कुणाल खूप खुश झाला.

| Sakal

त्याला वाटलं आता आपलं घर आणि कुटुंब प्रसिद्ध झालं आहे. काश्मिर मधील त्या दुर्घटनेनंतर कुणालच्या कुटुंबानं काश्मिर सोडलं.

| Sakal

तब्बल २५ वर्षांनी कुणाल एका सिनेमाच्या शूटिंग निमित्तानं पुन्हा काश्मिरमध्ये परतला. अन् आपल्या जुन्या घराला त्यानं भेट दिली. काश्मिरी लोकांना भेटून त्यानं काश्मिरी भाषेत संवादही साधला होता.

| Sakal

आमिर खान सोबत 'हम है राही प्यार के',अजय देवगणसोबत 'जख्म' ,सलमान खानसोबत 'जुडवां' अशा कितीतरी हिट सिनेमातून कुणालनं बाल कलाकाराच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सध्या त्याच्या 'अभय ३' या वेबसिरीजला अधिक पसंत केलं जात आहे.

| Sakal