बॉलिवूड, टॉलिवूड अन्‌ कोलिवूड... हॉट आकांक्षाचा मुक्त संचार

श्रीनिवास दुध्याल

जयपूर (राजस्थान) (Jaipur, Rajasthan) येथे जन्मलेल्या अन्‌ वाढलेल्या आकांक्षा सिंगची (Akanksha Singh) गोष्टच निराळी आहे. 'ना बोले तुम ना मैने कुछ कहा' या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून तिने करिअरला सुरुवात केली.

आकांक्षा सिंग | sakal

यासह आकांक्षाने छोट्या पडद्यावर 'गुलमोहर ग्रॅंड', 'परंपरा' आदी जवळपास दहाहून अधिक विविध मालिकांमध्ये काम केले. विशेष म्हणजे तिची आईही कलाकार आहे.

आकांक्षा सिंग | Sakal

आकांक्षाने 2017 मध्ये 'बद्रिनाथ की दुल्हनिया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात वरुण धवन व आलिया भट्ट हे दोघे प्रमुख भूमिकेत होते.

आकांक्षा सिंग | Sakal

2018 मध्ये मात्र आकांक्षाचं नशीब फळफळलं अन्‌ तिने थेट तेलुगु चित्रपट 'मल्ली रावा' या चित्रपटात अभिनेता सुमंतबरोबर प्रमुख भूमिकेत चमकली.

आकांक्षा सिंग | Sakal

या चित्रपटासाठी तिला तेलुगु चित्रपटातील सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा SIIMA पुरस्कार मिळाला. 2018 मध्येच तिला तेलुगु चित्रपट 'देवदास'मध्ये सुपरस्टार नागार्जुनबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

आकांक्षा सिंग | Sakal

यानंतर आकांक्षाने कन्नड चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला. 2019 मध्ये 'पैलवान' चित्रपटाद्वारे कन्नड स्टार सुदीप व बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीबरोबर कन्नडमध्ये दमदार पदार्पण केलं.

आकांक्षा सिंग | Sakal

या वर्षी (2022) आकांक्षा तमिळ चित्रपट 'क्‍लॅप', तेलुगु चित्रपट 'मीट क्‍यूट' व हिंदी चित्रपट 'रनवे'मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आकांक्षा सिंग | Sakal

आज आकांक्षा सिंग विविध भाषांमधील चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ती सोशल मीडियावरही ऍक्‍टिव्ह असून, तिच्या हॉट इमेजचा अंदाज यावरून दिसून येतो.

आकांक्षा सिंग | Sakal

आंकाक्षा तिच्या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवर अपडेट राहते व फोटोज व व्हिडिओजद्वारे ती चाहत्यांना भेट देत राहते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फॅन्स फॉलोअर्स मोठ्या संख्येने आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आकांक्षा सिंग | Sakal