रविवार, 3 एप्रिलपासून रमजान महिना सुरू झालाय. रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे, त्याला रमजान असंही म्हणतात.
या खास प्रसंगी अभिनेत्री नेहा मलिक (Actress Neha Malik) पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळं चर्चेत आलीय. तिनं खास रमजानसाठी फोटोशूट केलंय.
रमजान (Ramadan) दिनी प्रसिद्ध अभिनेत्रीनं फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नेहा मलिकनं हिरव्या रंगाच्या सलवार सूटमध्ये फोटोशूट केलंय.
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट करण्याचं कारणही नेहानं सांगितलंय. वास्तविक, इस्लाम धर्माची स्थापना करणारे प्रेषित मुहम्मद नेहमीच हिरवे कपडे परिधान करायचे. त्यांचा असा विश्वास होता की, हिरवा रंग आनंद, शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. यामुळंच नेहानं देखील हिरव्या रंगाच्या ड्रेसला प्राधान्य देत रमजानच्या शुभेच्छा दिल्यात.
नेहानं तिचे काही फोटो शेअर केलेत. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे आणि अल्लाह तुम्हाला शांती आणि आशीर्वाद देवो, अशी प्रार्थना तिनं केलीय.