Raveena Tandon च्या मुलीचा ग्लॅमरस लूक

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड विश्वात सध्या स्टार किड्समध्ये खूप स्पर्धा सुरुय. कधी सुहाना सुंदर दिसतेय, तर कधी शनाया आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करते.

पण, या सगळ्यांशिवाय रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी देखील खूप सुंदर आहे.

सेलिब्रिटी मुलांना 'स्टार किड्स' (Star Kids) म्हणतात. कारण, जन्माला येताच त्याच्याकडं मीडियाचं लक्ष वेधलं जातं आणि बघता-बघता ते सेलिब्रिटीही बनतात.

याचप्रमाणं रवीना टंडनची मुलगी राशा थडानी (Rasha Thadani) देखील खूप चर्चेत आहे.

90 च्या दशकात लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या रवीना टंडनच्या सौंदर्यात आजही बदल झालेला नाही. आईप्रमाणंच राशाही खूप सुंदर आहे.

राशा ग्लॅमरच्या बाबतीत तिच्या आईपेक्षाही खूप पुढं आहे.

रवीना टंडननं 2004 मध्ये अनिल थडानीशी (Anil Thadani) लग्न केलं होतं. राशा ही अनिल थडानी आणि रवीना टंडन यांची मुलगी आहे. अनिल हे बॉलिवूडचे एक प्रसिद्ध निर्माते असून एए फिल्म्सचे मालक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

actress raveena tandon daughter rasha thadani