नमिता धुरी
कोल्हापुरातील एका गावात २६ जून १८७४ रोजी यशवंतराव घाटगे म्हणून जन्माला आलेल्या एका दहा वर्षीय मुलाला सहावे शिवाजी यांच्या विधवा पत्नी महाराणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले. १८९४ मध्ये सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर यशवंतराव यांचे नाव बदलून शाहूजी महाराज असे ठेवण्यात आले.
कुस्ती हा शाहू महाराजांचा आवडता खेळ होता. त्यांच्या काळात देशभरातील मल्ल कुस्तीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात येत असत. १८९१ साली शाहू महाराजांचे लग्न बडोद्याच्या लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी झाले. त्यांना दोन मुले आणि दोन मुली झाल्या.
शाहू महाराजांनी समाजातील दुर्बल वर्गाला शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिले. प्राथमिक शिक्षण अनिवार्य केले. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी वसतिगृहे उभारली. सध्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेले राजाराम महाविद्यालय शाहू महाराजांनी उभारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली असता शाहू महाराजांना त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटले. १९१७ ते १९२१ या काळात सातत्याने दोघांची भेट होत होती. त्यांनी जातीभेदाच्या विरोधात पावले उचलली. जातिआधारित आरक्षणासारख्या संकल्पना रुजवल्या.
६ मे १९२२ रोजी वयाच्या ४७व्या वर्षी शाहू महाराजांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा राजाराम तिसरा हा कोल्हापूरचा महाराज बनला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.