अक्षय कुमारचं मानधन घसरलं,जाणून घ्या नवीन आकडा

प्रणाली मोरे

अक्षय कुमार(Akshay Kumar) हा बॉलीवूडच्या सगळ्यात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. २००७ मध्ये 'वेलकम' सिनेमा सुपरहिट झाल्यावर त्यानं आपल्या मानधनाचा(Fee) आकडा थेट ९९ करोड केला होता.

Esakal

लॉकडाऊनमध्ये जिथे प्रत्येकजण कामाविना बसला होता,तिथे अक्षय कुमार सतत कामात बिझी होता. त्यानं आपलं मानधन १०८ करोडवरनं ११२ करोड केलं होतं.

Esakal

'बच्चन पांडे' सिनेमाचं बजेट हे अक्षय कुमारच्या मानधनामुळे वाढल्याची ओरडही ऐकायला मिळाली होती. बॉक्सआफिसवर बच्चन पांडेनं ६० करोडपर्यंतच मजल मारली होती. आणि निर्मात्यांना अक्षयच्या तगड्या मानधनामुळं मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.

Esakal

केवळ 'बच्चन पांडे'च नाही तर 'बेल बॉटम' आणि अन्य सिनेमांना देखील अक्षयच्या तगड्या मानधनामुळं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं.

Esakal

आपल्या मानधनामुळं सिनेमा फ्लॉप झाल्यावर निर्मात्यांना नुकसानं होत आहे हे लक्षात आल्यावर अक्षयनं आपलं मानधन कमी करायचं ठरवलं आहे.

Esakal

आता अक्षय २००७ मध्ये जितकं मानधन घ्यायचा तेवढंच घेणार आहे. साधारण १०० करोडच्या आता त्यानं आपल्या नवीन मानधनाचा आकडा ठेवला आहे.

Esakal

आपल्या आगामी 'सेल्फी','सोरारई पोटरू' च्या रीमेकसाठी अक्षयनं नवीन मानधनाच्या आकड्याप्रमाणे फी आकारली आहे.

Esakal

बातमी मात्र कानावर पडलीय की,अक्षयनं आपल्या आगामी 'सिंड्रेला' या सिनेमासाठी १३५ करोड मानधनाची मागणी केली आहे.

Esakal

'बडे मियां,छोटे मियां' साठी अक्षय कुमारनं १४० ते १५० करोड मानधनाची डिमांड केल्याचंही कळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal