अक्षय कुमारनं काशीच्या विश्वनाथाला घातलं साकडं...

प्रणाली मोरे

'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिनेमातील मुख्य कलाकार अक्षय कुमार(Askhay Kumar) आणि मानुषी छिल्लर(Manushi chillar) काशीला गेले होते.

Esakal

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर सध्या 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलतेच व्यस्त आहेत.

Esakal

'सम्राट पृथ्वीराज' यांच्या पराक्रमाचा इतिहास मोठ्या पडद्यावर आणणारा हा सिनेमा ३ जून,२०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.

Esakal

या सिनेमात अक्षयनं सम्राट पृथ्वीराज यांची, तर मानुषी छिल्लर त्यांची पत्नी संयोगिता हिची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

Esakal

सिनेमा प्रदर्शित होण्याआधी काशीच्या विश्वनाथाचे आशीर्वाद घेण्यासाठी अक्षय आणि मानुषी तिथे गेले होते. मानुषी आणि अक्षय दोघांनीही काशी विश्वनाथ मंदीरात पूजा करतानाचे आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Esakal

अक्षय आणि मानुषीनं गंगा नदीच्या किनाऱ्यावरील घाटावर पूजेचा आनंदही घेतला. त्यावेळी घाटाला दिव्यांच्या रोषणाईनं सजवलं गेलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal