आलियाचा 'ग्लॅमरस लूक'; हातात लाखाची पर्स, तर पायात दीड लाखांचे सॅंडल

सकाळ डिजिटल टीम

बाॅलीवूड अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) स्वतःसाठी 'मोनोटोन स्टाईल'चे (Monotone style) कपडे निवडले असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. आलियानं निळ्या रंगाची पँट घातली असून त्यावर त्याच रंगाचा टॉप देखील परिधान केलाय.

आलियानं निळ्या रंगाची लेदर पँट घातली आहे, त्यावर बूटकट डिझाइन असलेला स्लीव्हलेस टॉप परिधान केलाय.

प्रवासादरम्यान आलिया DIOR ची बुक टोट बॅग घेऊन जाताना दिसली. ती तिची आवडती पर्स आहे.

आलियाच्या या आवडत्या पर्सची किंमत अधिकृत वेबसाइटवर 3400 डॉलर्स असून भारतीय चलनात सुमारे 2,54,465 रुपये इतकी आहे.

आलियानं पायात महागडी चप्पल देखील घातलीय. जी लुई व्हिटन (Louis Vuitton) कंपनीची असून त्याची किंमत 1,53,438 रुपये इतकी आहे. सध्या आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Actress Alia bhatt