प्रेग्नंसी आणि लाईनअप एवढे चित्रपट ? गुड न्यूजसह आलियाच्या हाती एवढे प्रोजेक्ट्स

सकाळ ऑनलाईन टीम

नुकतीच आलिया रणबीर या जोडप्याने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.आलियाच्या प्रेग्नंसी बरोबरच तिच्या हाती काही महत्वाचे प्रोजेक्ट्स लाईनअप आहेत.

आलिया आणि रणबीर हे जोडपं 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात जोडीनं दिसणार आहे.९ सप्टेंबरला हा चित्रपट सिनेमाघरांमधे रिलीज होणार आहे.

आलिया करण जोहरच्या येणाऱ्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगसह दिसणार आहे.

आलिया पहिल्यांदाच 'डार्लिंग' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.या चित्रपटात शेफाली शाह,विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू दिसणार आहेत.'डार्लिंग' हा चित्रपट पुढल्या वर्षी ओटीटीवर रिलीज होणार आहे.

आलिया फरहान अख्तरच्या रोड ट्रीप ड्रामामधे प्रियंका आणि कतरिनासह दिसणार आहे.२०२३ मधे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आलियाच्या हाती एक हॉलीवुड प्रोजेक्ट देखील आहे.हार्ट ऑफ स्टोन या हॉलीवुड चित्रपटात ती दिसणार आहे.काही दिवसांतच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.