Amjad Khan Death Anniversary: शोलेचे 'गब्बर सिंग' बनून अजरामर झाले 'अमजद खान'

सकाळ डिजिटल टीम

अमजद खान यांचा जन्म 27 जुलै 1940 रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षणही मुंबईतच झाले. अमजद खान यांचे वडील जयंत खान हे देखील व्यवसायाने अभिनेते होते.

Amjad Khan | esakal

त्यांच्या 1975 सालच्या शोले या चित्रपटातील गब्बरसिंग व मुकद्दर का सिकंदर (1978) या हिंदी चित्रपटातली खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.

Amjad Khan | esakal

अमजद खान यांना चहाची खूप आवड होती. ते एकामागून एक अनेक कप चहा प्यायचे. चित्रपटाच्या सेटवरही ते भरपूर चहा प्यायचा. असे म्हटले जाते की ते दिवसातून किमान 80 कप चहा प्यायचा.

Amjad Khan | esakal

अमजद खानचा धाकटा भाऊ इम्तियाज खान यानेही अभिनय केला होता. अमजद खान आपल्या वडिलांना अभिनय व्यवसायात आपले गुरु मानत. आयुष्यात मिळालेल्या यशाचे श्रेय वडिलांना दिले.

Amjad Khan | esakal

आजही लोक त्यांना 'शोले' चित्रपटातील 'गब्बर सिंग' या व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखतात.

Amjad Khan | esakal

अभिनेता अमजद खान आज या जगात नसले तरी, पण त्यांचा अभिनय आणि कथा आजही जिवंत आहेत. या अभिनेत्याची आज पुण्यतिथी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amjad Khan | esakal