लिपस्टिकमुळे स्त्रियांचा लुक अधिक खुलून दिसतो. एखाद्या पार्टीला किंवा कार्यक्रमाला जायचं असेल, किंवा अगदी ऑफिसला जायचं असेल तरी मुली लिपस्टिक वापरतात.
लिपस्टिकमुळे मुली अधिक सुंदर दिसतात हे खरंय मात्र लिपस्टिक लावतेवेळी काही गडबड झाल्यास पुर्ण लुक खराब होऊ शकते.
त्यामुळे लिपस्टिक लावताना काही चुका करणं टाळायला हव्या.
जर तुम्ही लिपस्टिक शेडसाठी एकच लिप लायनर वापरत असाल, तर असं करणं टाळा. पीच लिपस्टिक शेडसोबतच लाईट लिप लायनरचाही वापर करा.
अनेक मुली ओठांवर डार्क लिप लायनरसोबत लिपस्टिक कोट लावतात. परंतु लिपस्टिकमध्ये सॉफ्ट टेक्चर अधिक चांगलं वाटते.
जास्त कोरड्या किंवा ड्राय फॉर्मुलायुक्त लिपस्टिकचा तुमच्या ओठांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे ड्राय लिपस्टिक वापरणं टाळा.
लिपस्टिक लावण्यापूर्वी थोडं फाऊंडेशन लावा, त्यानंतर लिप प्रायमर आणि त्यानंतर लिपस्टिक लावा.
ओठांचा मेकअप करण्यापूर्वी लिप स्क्रबचा वापर करणं आवश्यक आहे. परंतु नॉर्मल स्क्रबचा वापर ओठांवर करू नये.
अनेक महिला आपल्या रंगानुसार लिपस्टिकचा रंग निवडत नाहीत, त्यामुळे ही चूक करणं टाळा.
अनेक महिला लिपस्टिक ट्राय न करताच खरेदी करतात, परंतु ही चुक टाळा.