बीट, टोमॅटो आणि गाजर हे तीन महत्वाचे घटक शरीरासाठी फायद्याचे असल्याचे सांगितले जाते.
यामध्ये असणारे पोषकतत्व शराराची झीज भरुन काढण्याचे काम करतात.
शरीरातील रक्त कमी झाल्यास या तिन्हींचा एकत्रित रस पिण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत असतात.
आज आपण हा रस कसा बनवायचा याची अगदी थोडक्यात रेसिपी पाहणार आहोत.
सुरुवातील गाजर, बीट आणि टोमॅटो स्वच्छ धूवुन घ्या. नंतर त्याचे थोडे मोठे काप करुन घ्या.
हे काप एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घाला आणि ते काही मिनिटांसाठी शिजायला ठेवा.
१० मिनीटांनी शिजलेला हा पदार्थ त्या पाण्यासहित मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
आवश्यकता असल्यास यात थोडे पाणी वाढवा, वरून थोडी कोथिंबीर घाला आणि मीठ घालुन गरमागरम पिऊन टाका.