Kriti Sanon च्या 'बॉस लेडी' लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री क्रिती सेनन ही इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती तिच्या स्पष्ट मत आणि भन्नाट अभिनयासाठी ओळखली जाते.

यासोबतच क्रिती तिच्या सिनेमांसंबंधित अपडेट्सही सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

बॉलीवूडच्या क्रितीनं पुन्हा एकदा तिच्या क्लासी आणि बॉस लेडी लूकनं इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. या ताज्या फोटोंमध्ये क्रिती सेनन खूपच स्टनिंग लूकमध्ये दिसतेय.

या फोटोंत क्रिती सेनन कॉफी कलरच्या कोट-पॅन्टमध्ये पहायला मिळतेय. क्रितीनं आपले केस बनमध्ये बांधलेले दिसताहेत. शिवाय, तिचा स्मोकी मेकअप चाहत्यांना भुरळ घालतोय.

क्रितीनं तिच्या कानात सोन्याचे झुमके आणि पायात काळ्या रंगाचं उंच टाचेचं सॅंडल घातलंय.

सोशल मीडियावर क्रिती सेननचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात.

क्रिती सेननं आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Kriti Sanon