अरबाज, अर्जुननंतर आता मलायका 'या' Chocolate Boy च्या प्रेमात

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या ग्लॅमरस शैली आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मलायका आता 48 वर्षांची झाली. पण, तिला पाहून मलायकाचं वय इतकं असेल, असं कोणीच म्हणू शकत नाही.

| Sakal

तिला पाहून मलायका अजून 27 वर्षांची आहे असंच वाटतं. मलायका एक अभिनेत्री असण्याबरोबरच एक डान्सर, मॉडेल आणि व्हीजे देखील आहे.

| Sakal

मलायकाला बॉलिवूडची बोल्ड 'आयटम गर्ल' म्हणूनही ओळखलं जातं. तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळं ती लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

| Sakal

मलायका ही सलमानचा भाऊ अरबाज खानची (Arbaaz Khan) एक्स वाईफ आहे. दोघांनी लग्नाच्या 19 वर्षांनंतर घटस्फोट घेत आपल्या आयुष्यातील पुढील वाटचालीला सुरुवात केलीय.

| Sakal

त्यानंतर मलायकानं अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) नातं जोडलं. दोघेही एकमेकांना डेट करताहेत, तर अरबाज देखील जॉर्जियासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.

| Sakal

मलायका आणि अर्जुनच्या नात्याबद्दल बोलायचं झालं, तर काही काळापासून दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण, अर्जुन चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्यानं ते काही दिवस एकत्र दिसले नव्हते. त्यामुळं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या जोर धरु लागल्या होत्या.

| Sakal