Mouni Roy New Photoshoot : टीव्ही विश्वातून आपल्या करिअरची सुरुवात करून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) दररोज आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
मौनी रॉय अभिनयासोबतच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
मौनी रॉयनं पुन्हा एकदा तिचे साडीतील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
फोटोमध्ये मौनी रॉयनं मल्टी कलर सीक्विन साडी (Multi color sequined saree) घातली असून ती फोटोंत वेगवेगळी पोज देताना दिसत आहे.
मौनी रॉयचा हा लूक तिला चांगलाच उठून दिसत आहे. तिनं साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउजही घातला आहे.
मौनी रॉय यावर्षी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.