Rashmika: गुलाबी साडीत 'श्रीवल्ली', नजर नाय हलली!

सकाळ डिजिटल टीम

टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही तिच्या हटके लूकसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

अल्लु अर्जुनसोबत पुष्पामध्ये महत्वाची भूमिका रश्मिका मंदानानं साकारली होती. त्या भूमिकेला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राईजमध्ये रश्मिकानं श्रीवल्लीची भूमिका करताना प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. तिच्या सामीमधील नृत्यानं लक्ष वेधून घेतले होते.

आता रश्मिकाचा साडीतील लूक व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यावरील प्रतिक्रिया खास चर्चेचा आहे.

प्रेक्षकांना पुष्पाच्या दुसऱ्या भागाचे वेध लागले आहेत. पुष्पा 2 द रुल या नावानं हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे.

रश्मिका ही टॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी म्हणून तिची वेगळी ओळख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.