Rakul Preet Singh : दाक्षिणात्य अभिनेत्रीनं चाहत्यांना लावलं वेड

सकाळ डिजिटल टीम

Rakul Preet Singh Photos : दाक्षिणात्य आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) सध्या आगामी Runaway 34 या चित्रपटामुळं चर्चेत आहे.

Runaway 34 चित्रपटात ती अभिनेता अजय देवगणसोबत (Ajay Devgan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. दरम्यान, तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

आपल्या सौंदर्यामुळं अनेकदा चर्चेत राहणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

बुधवारी रकुल एका रिअॅलिटी शोच्या सेटबाहेर दिसली. तिथं तिची ही मनमोहक अदा चाहत्यांना पाहायला मिळाली. तिनं आपल्या ग्लॅमरस लूकनं लोकांना वेड लावलंय.

सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये रकुल प्रीत सिंह ऑफ शोल्डर ब्लाउज आणि प्रिंटेड साडीमध्ये कहर करत असल्याचं दिसून येतंय.

Runaway 34 या चित्रपटात रकुल प्रीतसोबत अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (John Abraham) देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 1 एप्रिल रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakul Preet Singh