Alia Bhatt : पांढरा शर्ट-जिन्समध्ये आलियाचा ग्लॅमरस लूक, चेहऱ्यावर दिसतंय मातृत्वाचं तेज!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Bollywood Actress Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आलिया तिच्या पर्सनल लाइफसोबतच प्रोफेशनल लाइफमुळं चर्चेत असते.

आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकले आणि जूनमध्ये त्यांनी त्यांच्या गर्भधारणेची घोषणा केली. प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर आलिया ट्रोलही झाली. मात्र, ट्रोल करणाऱ्यांना तिनं चोख उत्तरही दिलं.

नुकताच ‘डार्लिंग्स’च्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च झाला आणि प्रेक्षकांच्या तो पसंतीसही पडलाय.

दरम्यान, आलिया भट्टनं तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केलेत. त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि जीन्स घालून तिनं क्लासी पोज दिल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे त्यावर लाईट मेकअप केलाय.

प्रेगन्सी दरम्यान आलिया सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, आलियाचे हे फोटो तिच्या सिनेमाच्या प्रमोशनचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Actress Alia Bhatt